गोरेगाव : भगवान सर्वज्ञ चक्रधरस्वामी महानुभाव मंडळाच्यावतीने १५ व १६ एप्रिल रोजी महानुभाव पंथीयांची धर्मपरिषद व महामेळावा पंचकर्म महानुभाव सेवा आश्रम श्रीक्षेत्र डाकराम (सुकळी) येथे आयोजित करण्यात आला आहे. भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी महानुभाव मंडळ सर्व मंडळांच्या संयुक्तवतीने चैत्र पंचमीच्या पावन पर्वावर भरणाऱ्या यात्रेनिमित्ताने धर्मपरिषद व महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. रिद्धपूर अमरावतीचे महंत आचार्य अष्टूरकर बाबा यांच्या अध्यक्षतेत डाकराम (सुकडी) देवस्थानचे संचालक वैरामीबाबा शिवनेरकर यांच्या मार्गदर्शनात परिषद घेण्यात येत आहे. तसेच सर्व देवस्थानाचे महंत यावेळी उपस्थित राहणार आहे. सर्व धर्मप्रेमी भाविक भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन घोटी, गोरेगाव देवस्थानचे अध्यक्ष मुरलीधर राऊळकर यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)
महानुभावपंथीयांची धर्मपरिषद व महामेळावा आज व उद्या
By admin | Updated: April 15, 2017 00:55 IST