शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रूपेश मुळे नरबळी प्रकरणाचा आज निकाल

By admin | Updated: June 17, 2017 00:38 IST

वर्धेतच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधणाऱ्या येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणाचा निकाल उद्या शनिवारी जिल्हा न्यायालयात लागणार आहे.

२१ जणांची साक्ष : शिक्षेवर सुनावणी होण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वर्धेतच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधणाऱ्या येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणाचा निकाल उद्या शनिवारी जिल्हा न्यायालयात लागणार आहे. शनिवारी या प्रकरणात शिक्षेवर सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणातील आरोपीला न्यायालय काय शिक्षा ठोठावते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रारंभीपासूनच हे प्रकरण सर्वांकरिता आव्हानच ठरले होते. तपास करताना कुठलाही सुगावा नसताना आरोपीला पकडणे पोलिसांकरिता आव्हान होते. तर काही मोठ्या नावांना वाचविण्याकरिता पोलिसांनी बेबनाव केल्याचा आरोपीच्या वकिलांचा असलेला दावा मोडीत काढत प्रकरणाला न्यायालयात उभे करण्याचे आव्हान सरकारी वकिलांवर होते. हा सर्व प्रकार नरबळीचाच असल्याचे सिद्ध करण्याकरिता न्यायालयात तब्बल २१ साक्षदारांना हजर करण्यात आले. साक्षी पुराव्याअंती रूपेशचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला त्या ठिकाणाची पाहणी खुद्द न्यायाधिशांनी केली. यात न्यायाधीशांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांना न्यायालयात उत्तर देणे शासकीय अभियोक्त्यांना आव्हानच ठरल्याची माहिती आहे. याच काळात वर्धेतील शासकीय अभियोक्तांचा कार्यकाळ संपल्याने प्रकरण हाताळताना काही अडचणी आल्या. यामुळे सदर प्रकरण पूर्वीपासून हाताळणारे नागपूर परीक्षेत्र नागपूरचे अ‍ॅड. श्याम दुबे यांना पुन्हा विशेष नियुक्तीवर पाचारण करण्यात आले. त्यांनी पुन्हा सदर प्रकरण हाताळत निकालापर्यंत आणले. शनिवारी या प्रकरणात निकाल येण्याची शक्यता आहे. यात गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षेवर युक्तीवाद होणार असल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली. या प्रकरणातील आरोपी आसीफ पठाणला होणाऱ्या शिक्षेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.