शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

आज नगर परिषद आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2016 01:53 IST

नगर परिषदेच्या येत्या निवडणुकीला घेऊन जागांचे आरक्षण ठरविण्यासाठी आरक्षण सोडत शनिवारी (दि.२)

गोंदिया : नगर परिषदेच्या येत्या निवडणुकीला घेऊन जागांचे आरक्षण ठरविण्यासाठी आरक्षण सोडत शनिवारी (दि.२) दुपारी १२ वाजता नगर परिषद कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीमुळे शहरातील जागांच्या आरक्षणाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात नगर परिषद सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असून निवडणुका येत आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने यंदा दोन सदस्यांचा एक प्रभाग अशी प्रभाग रचना केली आहे. या नव्या प्रभाग रचनेला घेऊन नगर परिषदा आपल्या कामाला लागल्या आहेत. तसेच नव्या प्रभाग रचनेनुसार शहरात आता २१ प्रभाग होणार आहेत. म्हणजेच यात दोन सदस्यांची भर पडणार आहे. शिवाय नगर अध्यक्ष आता सदस्य संख्येच्या आधारावर न निवडता थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सदस्यांची संख्या वाढत असतानाच नगराध्यक्ष आता जनतेतून येणार व नगर परिषदेत प्रतिनिधींची संख्या वाढणार असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरिही प्रभागातील सदस्यांच्या आरक्षणाला घेऊन शहरवासीयांत संभ्रम व उत्सुकता आहे. यासाठीच शनिवारी (दि.२) नगर परिषदेच्या सभागृहात आरक्षण सोडत होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या आदेशावरून यासाठी बैठक बोलाविण्यात आली आहे. या आरक्षण सोडतीनंतर कोणत्या वॉर्डात कोणत्या प्रवर्गासाठी जागा आरक्षीत होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. (शहर प्रतिनिधी)