शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

१६८४ शाळांत तंबाखूबंदी

By admin | Updated: July 12, 2016 02:23 IST

विद्यार्थी व्यसनाच्या गर्तेत जाऊ नये यासाठी लहानपणापासून जडणाऱ्या तंबाखू या व्यसनापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी गोंदिया

नरेश रहिले ल्ल गोंदियाविद्यार्थी व्यसनाच्या गर्तेत जाऊ नये यासाठी लहानपणापासून जडणाऱ्या तंबाखू या व्यसनापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात शिक्षण विभागाने शासनाच्या निर्देशानुसार राबविलेल्या उपक्रमात जिल्ह्यातील १ हजार ६८४ शाळा तंबाखूमुक्त केल्या आहेत. तंबाखूच्या आहारी जाणार नाही अशी शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. कर्करोगासारखा असाध्य रोग या तंबाखूपासून जडत असते. तरीही टाईमपासच्या नावावर तंबाखूचे लागलेले व्यक्तीला मरणाच्या वाटेवर नेऊन सोडते. तरीही गोंदिया जिल्ह्यात तंबाखू खाणाऱ्यांची संख्या लाखावर आहे. येणारी पिढी तंबाखूच्या आहारी जाऊ नये यासाठी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने ७ नोव्हेंबर २०१५ ला पाठविलेल्या पत्रात शाळा तंबाखूमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार गोंदियाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी प्रत्येक शाळांना पत्र पाठवून तंबाखूमुक्त शाळा करण्यास सांगितले. त्यांच्या सुचनेनुसार गोंदिया जिल्ह्यातील १ हजार ६८४ शाळा तंबाखूमुक्त झाल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.या प्रत्येक शाळेच्या भिंतीवर तंबाखूमुक्त शाळा असे लिहीण्यात आले आहे. जिल्ह्यात तंबाखूमुक्त अभियानातून एकही शाळा सुटली नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २१४ शाळा, आमगाव १५८, देवरी २१०, गोंदिया ४०९, गोरेगाव १५९, सडक-अर्जुनी १७६, सालेकसा १५६ व तिरोडा २०१ अश्या १६८४ शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा तंबाखूमुक्त झाल्या असल्या तरी काही शिक्षक आजही तंबाखू चघळताना दिसतात.दंडात्मक कारवाई४शाळेत तंबाखू खाताना विद्यार्थी, शिक्षक किंवा कर्मचारी आढळले तर त्यांना २०० रूपये दंड म्हणून आकारण्याचा नियम तयार करण्यात आला आहे. शाळेच्या परिसरात १०० मीटरच्या अंतरात तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदर्थाची विक्री करण्यास बंदी करण्यात आली आहे. २.५० लाख विद्यार्थ्यांनी घेतली शपथ४गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील १६८३ शाळांतील २ लाख ५० हजार विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त जीवनाची शपथ शिक्षण विभागाकडून २२ जानेवारी २०१६ रोजी देण्यात आली. त्यानुसार शाळा तंबाखूमुक्त करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला.