शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा तालुक्यात बारदानअभावी धान खरेदी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:26 IST

बिरसी-फाटा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अखत्यारित विविध कार्यकारी सहकारी संस्था व आदिवासी विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात शासकीय आधारभूत खरेदी केंद्राचा ...

बिरसी-फाटा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अखत्यारित विविध कार्यकारी सहकारी संस्था व आदिवासी विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात शासकीय आधारभूत खरेदी केंद्राचा १ नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला. धान खरेदी करण्याची संबंधित केंद्रचालकांना ३१ मार्चपर्यंतच प्रशासनाने मुदत दिली आहे. मात्र आतापर्यंत खरेदी केलेल्या धानाची उचल करण्यात आली नसल्याने केंद्रावर धान पडून आहे. त्यात आता तिरोडा तालुक्यात बारदानअभावी धान खरेदी रखडली आहे.

तिरोडा तालुक्यात १६ हजार शेतकऱ्यांनी ५ लाख ३१ हजार क्विंटल धान आधारभूत केंद्रावर विकले, तर कित्येक शेतकऱ्यांनी धान विक्री करण्यासाठी केंद्रावर आणला आहे. पण केंद्रावर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत धानाची भराई करण्यासाठी संबंधित केंद्रचालकांना बारदान उपलब्ध करून दिले नसल्याने त्याचा धान खरेदीवर परिणाम झाला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हजारो क्विंटल धान केंद्रांवर बारदानअभावी पडून आहे. पण याकडे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे दुर्लक्ष होत आहे. तर अवकाळी पावसाचा फटका उघड्यावरील धानाला बसण्याची शक्यता आहे. तर शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही बोनस देण्यात आला नाही. धान खरेदीची मुदत ३१ मार्चपर्यंत असल्याने आता धान खरेदी करण्यासाठी केवळ आठ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. पण केंद्रावर बारदानच उपलब्ध नसल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

-----------------------

अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त

बारदान नसल्याने धान खरेदी बंद असतानाच आता अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांचा धान पावसामुळे खराब होऊ नये, अशी चिंता सतावत आहे. शिवाय अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांवरही त्याचा परिणाम होणार आहे.