शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडाचे एसडीओ कार्यालय ‘बंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:31 IST

येथील उपविभागीय कार्यालय (एसडीओ) शुक्रवारी (दि.१) दिवसभर बंदच होते. मात्र सदर कार्यालय का बंद ठेवण्यात आले याची कसलीही सूचना कार्यालय परिसरात नसल्याने आपल्या विविध कामांसाठी आलेले नागरिक तासनतास कार्यालय उघडण्याची वाट बघत होते.

ठळक मुद्देहलगर्जीपणा : कामानिमित्त आलेले नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : येथील उपविभागीय कार्यालय (एसडीओ) शुक्रवारी (दि.१) दिवसभर बंदच होते. मात्र सदर कार्यालय का बंद ठेवण्यात आले याची कसलीही सूचना कार्यालय परिसरात नसल्याने आपल्या विविध कामांसाठी आलेले नागरिक तासनतास कार्यालय उघडण्याची वाट बघत होते.विशेष म्हणजे, उपविभागीय कार्यालयातील एक महिला कर्मचारीसुद्धा कार्यालय परिसरात येवून कार्यालय उघडण्याची प्रतीक्षा करीत होती. त्यामुळे इतर नागरिकही काही वेळात कार्यालय उघडेल अशी आशा बाळगून होते. मात्र दुपारचे तीन वाजूनही कार्यालय उघडलेच नाही. त्यामुळे कामासाठी आलेल्या शेतकरी व नागरिकांनी परतीचा मार्ग धरला.या प्रकाराबाबत उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपाडे यांच्या भ्रमणध्वीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. तर तहसीलदार रामटेके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गुरूवारी (दि.३१) मतमोजणी असल्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत उपविभागीय अधिकारी व आम्ही सर्व भंडारा येथेच आहोत. तहसील कार्यालय सुरू असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र उपविभागीय कार्यालय का बंद ठेवण्यात आले, याची माहिती ते देवू शकले नाही.नागरिकांना अकारण त्रास होवू नये यासाठी कार्यालय का व कोणत्या दिवशी बंद ठेवण्यात येईल, याची आगाऊ सूचना कार्यालय परिसराच्या बाहेरील फलकावर लावणे गरजेचे असते. मात्र संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अशी कोणतीही सूचना फलकावर लावण्यात आली नाही. तब्बल दिवसभर कार्यालय बंद ठेवून कामासाठी आलेल्या नागरिकांचा संपूर्ण दिवस अकारण खराब करण्यात आला. परिणामी सदर दिवशी त्यांचे कोणतेही काम होऊ शकले नाही.