शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

येणारा काळ कठीण जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:26 IST

यंदा कमी प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे सध्या शेतकरी अडचणीत असतानाच येणाºया काळात सर्वांनाच याचा फटका सहन करावा लागणार आहे.

ठळक मुद्देअत्यल्प पाणीसाठा :जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा कमी प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे सध्या शेतकरी अडचणीत असतानाच येणाºया काळात सर्वांनाच याचा फटका सहन करावा लागणार आहे. कारण कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा आहे. आजची ही स्थिती असताना यावरून येणाºया काही महिन्यांच्या स्थितीचा अंदाज बांधता येतो.पाहिजे त्या प्रमाणात पाऊस आता बरसत नाही. त्यातही यंदा तर जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत कित्येक पटीने कमी पाऊस बरसला. परिणामी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतातील पीक हातून जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत. डोळ््यासमोर पीक मरत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. सध्या तरी कमी पावसाचा फटका फक्त शेतकºयांच्या चेहºयावरच दिसून येत असून सर्वसामान्य जनतेला याचा काहीच भान नाही. मात्र काही महिन्यांनी कमी पावसाचे दुष्परिणाम त्यांनाही भासणार यात शंका नाही.जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे प्रकल्प यंदा कमी पावसामुळे तहानलेलेच आहेत. या प्रकल्पांत अपेक्षेपेक्षा कित्येक पटीने कमी पाणीसाठा आजच्या स्थितीत आहे. किंवा नाममात्र पाणीसाठा असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नसून पावसा अभावी या प्रकल्पांची तहान भागलेली नाही. पावसाळ््यात या प्रकल्पांची ही स्थिती असताना काही महिन्यांनी प्रकल्पांत पाणी राहणार नाही तेव्हा मात्र काय होणार याची आताच कल्पना करता येईल. यामुळेच येणारा काळ कठीण जाणार असल्याची चिन्हे आतापासून दिसून येत आहेत.शहरात दमदार पावसाची हजेरीपावसाळ््यात पाऊस जसा बरसायला हवा तसा काही बरसला नाही. आता मात्र परतीच्या वेळी पाऊस आपली हजेरी लावत आहे. सोमवारी (दि.११) शहरात सायंकाळी ४ वाजतापासून दमदार पावसाने हजेरी लावली.सुमारे अर्धा तास बरसलेल्या या पावसाने वातावरण गार झालेच शिवाय सर्वांनाच सुखावून सोडले. अशाच प्रकारे दररोज पाऊस बरसत राहील्यास काही प्रमाणात भरपाई होणार.यंदाच्या हंगामातील रबी कठीणचजिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही वरथेंबी पावसावरच आपली शेती करीत आहेत. यामुळे रबीचा हंगाम पाटबंधारे विभागाकडून देण्यात येणाºया पावसावरच अवलंबून असतो. अशात आता प्रकल्पांत पाणी नसताना रबीसाठी पाणी सोडणे कठीण आहे. यावरून आजच रबीचा हंगाम यंदा कठीणच असल्याचे स्पष्ट होते. प्रकल्पांतील पाण्याच्या भरवशावरच जिल्ह्याचा संपूर्ण खेळ चालतो. आता जिल्ह्यातील हे प्रकल्पच आॅक्सीजनवर असताना त्यांच्याकडून अपेक्षा करणे चूकीचे ठरणार आहे. ही स्थिती जिल्ह्यातील प्रकल्पांचीच नसून लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील व शेजारच्या भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पांचीही आहे.