शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सक्रांतीनिमित्त महिलांना ‘तिळाची’ भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 20:46 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव स्थिर दिसत असल्याने महिलांना संक्रातीनिमित्त एकप्रकारे वाणात ‘तिळाची’ भेट मिळाली आहे.

ठळक मुद्देतिळाचे भाव स्थिर : खरेदीसाठी वाढली गर्दी

आॅनलाईन लोकमतगोंदिया : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव स्थिर दिसत असल्याने महिलांना संक्रातीनिमित्त एकप्रकारे वाणात ‘तिळाची’ भेट मिळाली आहे. त्यामुळे संक्रातीनिमित्त तीळ खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली आहे. अशात यंदा तिळाचे लाडू बिनधास्त खाता येणार असल्याचे दिसते.‘तिळ-गुळ खा व गोडगोड बोला’ ही म्हण संक्रातीसाठी प्रचलीत आहे. बाजारात तिळ दिसताच संक्रातीची आठवण येते व डोळ््यापुढे येतात ते तिळाचे लाडू. तिळाचे भाव चांगलेच उंचावलेले राहत असल्याने तिळाचे लाडू बनवितानाही बजेटवर नजर ठेवावी लागते. मात्र मागील वर्षापासून तिळाचे चांगले उत्पादन होत असल्याने तिळाचे भाव स्थिर दिसून येत आहे. परिणामी महिलांना संक्रांतीत दिलासा मिळाला आहे.संक्रात आली की तिळ-गुळ या दोन वस्तूंची खरेदी वाढते. आता रविवारी (दि.१४) संक्रांत आली असल्याने महिला व पुरूषांची बाजारात तीळ-गुळ खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. येथे दुकानांसोबतच बाजारात रस्त्यावर दुकानी लावून तीळ विकणारे विक्रेतेही ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात येतात. त्यांच्या घरचे उत्पादन किंवा ग्रामीण भागातून खरेदी करून शहरात विकण्यासाठी ते दुकान लावत असल्याचे दिसते.हाच प्रकार यंदाही बाजारात दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला दुकान लावून तिळ व गूळ विकले जात असून जागोजागी हातठेलेही दिसत आहेत. सध्या या विक्रेत्यांकडे खरेदी करणाºयांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे. यंदा भाव कमी असल्याने थोडे जास्त लाडू तयार करून त्यांचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठीचीही तयारी दिसत आहे.तीळ १०० रुपयापासूनगोंदियाच्या बाजारात सध्या पांढरे व काळ््या दान्याचे तीळ विक्रीला आले आहे. यात पांढरे व काळ््या दान्याचे तीळ १०० रूपये किलो दराने विकले जात आहे. शिवाय ४० रूपये किलो दराने गुळ विकला जात आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीही तिळाचे दर असेच होते. चांगले उत्पादन झाल्याने तीळाचे भाव स्थिर दिसत आहे. दर स्थिर असल्याने ग्राहक चांगलीच खरेदी करीत असल्याचेही येथील विक्रेते छबीलाल बानासुरे यांनी सांगीतले.रेडिमेड पपडीही उपलब्धआजच्या युगात प्रत्येकच वस्तू किंवा पदार्थ रेडीमेड उपलब्ध असतानाच बाजारात तिळाची पपडीही रेडिमेड विकली जात आहे. धकाधकीच्या जीवनात तिळ खरेदी करून त्याचे लाडू व पपडी तयार करण्यासाठी नोकरदार महिलांकडे तेवढा वेळ नसतो. त्यामुळे त्यांचा कल रेडीमेड पपडीकडे असतो. नेमकी हीच बाब हेरून बाजारात रेडीमेड पपडी उपलब्ध करण्यात आली आहे.तीळ-गुळ सेवनामागे औषधीय लाभमकर सक्रांत येते तेव्हा शिशिर ऋतू शेवटच्या टप्यात असतो. थंडीत शरिरात कफ वाढून जमा होतो. तसेच वाताचा त्रासही असतो. आयुर्वेदानुसार तीळ हे सर्वाेत्कृष्ट स्नेह द्रव्य असल्याने त्याच्या जोडीला गुळ दिल्यास कफाचं पचन होऊन वाताचं शमन होते. त्यामुळे पुढे येणाºया वसंत ऋतूतील ऋतूजन्य (सिजनल व वायरल) आजारांचा त्रास होत नाही. त्यामुळेच संक्रांतीत तीळ-गुळ खाण्याची परंपरा पूर्वजांनी सुरू केल्याचे वैद्य सांगतात.