शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पाचा ताडोबाच्या धर्तीवर विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 20:32 IST

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहेत. त्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प लाभले आहे. मात्र व्याघ्र प्रकल्प अन्य प्रकल्पांच्या तुलनेत कोठेतरी कमी पडत आहेत. आता वन खाते माझ्याकडे असल्याने येथील व्याघ्र प्र्रकल्पाचा ताडोबाच्या धर्तीवर विकास करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगीतले.

ठळक मुद्देपरिणय फुके : पत्रपरिषदेत केली विविध विषयांवर चर्चा, मंत्री बनल्यानंतर प्रथम नगरागमन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहेत. त्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प लाभले आहे. मात्र व्याघ्र प्रकल्प अन्य प्रकल्पांच्या तुलनेत कोठेतरी कमी पडत आहेत. आता वन खाते माझ्याकडे असल्याने येथील व्याघ्र प्र्रकल्पाचा ताडोबाच्या धर्तीवर विकास करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगीतले.मंत्रीपद स्वीकारल्यानंतर येथे रविवारी (दि.३०) येथे प्रथमच आगमन झाले असता शासकीय विश्रामगृहात आयोजीत पत्र परिषदेत पत्रकारांसोबत चर्चा करताना ते बोलत होते. पुढे बोलताना नामदार डॉ. फुके यांनी, गोंदिया जंगलांचा जिल्हा आहे. मात्र सध्या आहे त्या व्याघ्र प्रकल्पाच्या विकासावर जोर दिला जाणार आहे. यासाठी रविवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. तसेच काही उपाययोजना डोक्यात असून एयर बी एन बी या कंपनीसोबत चर्चा झाली असून त्यांनी सर्वेक्षण केले आहे. जिल्ह्याला टुरिजम पॅलेस बनवायचे असून असे झाल्यास जिल्ह्यात टुरिजम वाढणार व यातून सुमारे २० हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील रिक्त पदांच्या विषयी माहिती देताना त्यांनी, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची यादी दिली आहे. रिक्त पदांमुळे नक्कीच कामे वेळेत होत नसल्याने सर्वच विभागांतील रिक्त पद तसेच पेंडींग कामांची यादी मागविली आहे. यातील जी कामे जनता दरबारातून सुटणार त्यांना लगेच सोडविणार असून मोठ्या कामांना बघणार असल्याचेही नामदार फुके म्हणाले. जिल्हा परिषदेत कॉँग्रेस सोबत कोव्हापर्यंत युती असल्याचे विचारले असता त्यांनी, जोपर्यंत जिल्हा कॉँग्रेस मुक्त होत नाही तोपर्यंतच ही युती असल्याचे उत्तर दिले.दर शनिवारी जनता दरबारयाप्रसंगी नामदार फुके यांनी आठवड्यातील तीन दिवस गोंदियाला देणार असल्याचे सांगीतले. तसेच जिल्ह्यातील नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांना सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार असून यासाठी दर शनिवारी जनता दरबार घेणार. त्यात जिल्हाधिकाºयांपासून अन्य सर्वच विभागांचे अधिकारी उपस्थित राहतील व यासाठी सर्वांना सूचना दिल्या जाणार आहेत. मिळालेल्या तीन महिन्यांत त्या दृष्टीनेच काम करावयाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संपर्कातसध्या सुरू असलेल्या नेत्यांच्या प्रवेशावरील चर्चांवर बोलताना नामदार फुके यांनी, कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील मोठ्या प्रमाणात नेते आमच्या संपर्कात आहेत. ते फक्त आमच्या ‘हो’ म्हणण्याची वाट बघत आहेत. आज भाजप आपल्या बळावर निवडून आली असून आम्हाला कुणाचीही गरज नाही. तरिही पक्षात संयुक्तरित्या निर्णय घेतले जात असल्याचे ते म्हणाले.कुणालाही मंत्रिपदावरून काढले नाहीराजकुमार बडोले यांच्या मंत्रिपदाच्या विषयावर बोलताना नामदार फुके यांनी, बडोले यांनी त्यांच्या बैयक्तीक कारणांतून राजीनामा दिला. त्यांनी आपल्या साडे चार वर्षांच्या कार्यकाळात कित्येक चांगली कामे केली असून मिळालेल्या तीन महिन्यांत त्यांची कामे पुढे घेऊन जायची आहेत. शिवाय, कुणालाही मंत्रीपदावरून काढले नसल्याचेही ते म्हणाले.