शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

बस थांब्यांवर तिकिट बुकिंग एजंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 21:04 IST

राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढावे तसेच प्रवाशांच्या सोयीकरिता आता प्रवासी थांब्यांवर ‘तिकिट बुकिंग एजंट’ची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी परिवहन महामंडळाने ट्रायमॅक्स कंपनीसह करार केला आहे. या प्रयोगाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे.

ठळक मुद्देपरिवहन महामंडळाचा प्रयोग : उत्पन्न वाढ व प्रवासी सुविधेसाठी प्रयत्न

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढावे तसेच प्रवाशांच्या सोयीकरिता आता प्रवासी थांब्यांवर ‘तिकिट बुकिंग एजंट’ची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी परिवहन महामंडळाने ट्रायमॅक्स कंपनीसह करार केला आहे. या प्रयोगाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. सध्या शहरातील रेल्वे स्थानक तसेच जयस्तंभ चौकात तिकीट बुकींग एजंटची नेमणूक करण्यात आली असून काही दिवसांत अजून काही बस थांब्यांवर हे तिकीट बुकींग एजंट नेमले जाणार आहेत.आजघडीला अवैध प्रवासी वाहन राज्य परिवहन मंहामंडळासाठी डोकेदुखी ठरत आहेत. या प्रवासी वाहनांमुळे परिवहन महामंडळ तोट्यात जात आहे. यात कुठेतरी परिवहन महामंडळाची बाजू कमजोर असणे हे देखील कारण असू शकते. कित्येकदा बसेसमध्ये वाहक नसल्याने प्रवाशांची सुविधा होत नाही. प्रवासी अन्य खासगी प्रवासी वाहनांकडे वळतो. कित्येकदा वाहकच प्रवाशांना तिकीट न देता अपहार करीत असल्याचेही प्रकार घडले आहेत. याचा परिवहन महामंडळालाच भुर्दंड बसतो. या सर्व प्रकारावर तोडगा काढता यावा. यासाठी राज्य परिवहन महामंडळाने आता नवीन प्रयोग हाती घेतला आहे. यांतर्गत राज्य परिवहन महामंडळाने ट्रायमॅक्स कंपनीसोबत करार केला आहे. ही कंपनी आता प्रवासी थांब्यांवर ‘तिकीट बुकींग एजंट’ची नेमणूक करणार आहे. हे एजंट त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी वेळेवर हजर राहून देण्यात आलेल्या मशीनद्वारे प्रवाशांना तिकीट देवून बसमध्ये बसवून देतील. वाहक नसलेल्या बसच्या चालकाला तिकीट कलेक्शन रिपोर्ट देतील. यामुळे आता प्रवाशांना तिकीटसाठी बस थांब्यांवर एजंट मिळणार असून गरज पडल्यास हे एजंट त्यांना बसमध्ये बसवून देणार असल्याने प्रवाशांना अधिक सोयीचे होणार आहे.या एंजटवर आगार व्यवस्थापक व बसस्थानक प्रमुखाचे नियंत्रण राहणार असून त्यांच्याकडून अपेक्षीत कामाची तपासणी, प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाची माहिती दररोज घेतील. दररोजच्या तिकीट विक्रीचा रिपोर्ट तसेच एजंटांनी बुकींग केलेल्या तिकिटांची फेरीनिहाय माहिती विशेष प्रोग्राममध्ये दिसणार आहे. एजंटला थांब्याच्या ठिकाणी हजर राहण्याबाबत आदल्या दिवशी नियोजन करावयाचे आहे. तसेच विभागीय वाहतूक अधिकारी, मार्ग तपासणी पथक तसेच सुरक्षा व दक्षता खाते यांनी वेळोवेळी थांब्यांवर जावून एजंटची तपासणी करावयाची आहे. गैरप्रकार आढळल्यास त्वरीत मध्यवर्ती कार्यालय महाव्यवस्थापकांना अहवाल पाठवायचा आहे. या प्रयोगामुळे आता वाहकांचा मनमर्जीपणा व होणारे अपहाराचे प्रकारही संपुष्टात येणार आहे.तालुका स्थळाच्या स्थानकांवर होणार नेमणूकपरिवहन महांडळाकडून सध्या शहरातील रेल्वे स्टेशन व जयस्तंभ चौकात तिकीट बुकींग एजंटची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र मध्यंतरी बालाघाट बसमध्ये काहीतरी घोळ दिसून आल्याने लगेच बालाघाट व बैहर येथे एजंटची नेमणूक करण्यात आली. आता जिल्ह्यातील गोरेगाव, आमगाव व देवरी या तालुका स्थळांवरील बस स्थानकांसह रावणवाडी व रजेगाव येथील थांब्यांवर एजंटची नेमणूक केली जाणार आहे. येत्या ८ दिवसांत येथे एजंटची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :ticketतिकिट