शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तिबेटियनांचा ‘थँक यू इंडिया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:32 IST

ज्या मातृभूमीत जन्मलो, तेवढेच प्रेम भारत मातेने केले. या प्रेमाच्या वर्षावामुळे आम्ही परेदशात निर्वासित आहोत हे कधीच वाटले नाही. भारतीयांच्या प्रेमळ वागणुकीमुळे आम्ही पुलकित झालो आहोत. याचे ऋण फेडू शकत नाही.

ठळक मुद्देगोरगरिबांना वितरित केली उबदार वस्त्रे

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : ज्या मातृभूमीत जन्मलो, तेवढेच प्रेम भारत मातेने केले. या प्रेमाच्या वर्षावामुळे आम्ही परेदशात निर्वासित आहोत हे कधीच वाटले नाही. भारतीयांच्या प्रेमळ वागणुकीमुळे आम्ही पुलकित झालो आहोत. याचे ऋण फेडू शकत नाही. आपलेही काही देणे आहे या भावनेतून ‘ कव्हर द कोल्ड’ हा कार्यक्रम नार्गोलिंग तिबेटीयन वसाहत प्रतापगड येथे बुधवारी साजरा करण्यात आला.१० डिसेंबर १९८९ रोजी तिबेट सरकारचे प्रमुख व सर्वोच्च आध्यात्मिक नेते दलाई लामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचा वर्धापन दिवस दरवर्षी तिबेटीयन बांधव साजरा करतात. प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना घेवून विविध उपक्रम या वसाहतीत साजरे केले जातात. यापूर्वी ग्रिन इंडिया, स्वच्छ भारत, भूखा है उसे खिलाओ अशी नानाविध कार्यक्रम राबविण्यात आले. या वर्षी थँक यू इंडियाच्या माध्यमातून कव्हर द कोल्ड हा उपक्रम राबविला जात आहे. भारतीय आमचे बांधव आहेत.दरिद्र हे प्रत्येक देशातच कमी जास्त प्रमाणात असते.गरीबीमुळे काही लोकं उबदार वस्त्रे परिधान करु शकत नाहीत. अशा लोकांना कडाक्याच्या थंडीतून बचावासाठी उबदार वस्त्र द्यावेत हा या कार्यक्रमामागील हेतू आहे. हिवाळ्यात स्वेटर, जॅकेट यासारखी उबदार वस्त्रे विक्री करण्याचा तिबेटीयनांचा मुख्य व्यवसाय आहे. गोरगरीबांना उबदार वस्त्र देण्याचा संकल्प त्यांनी केला. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा येथे उबदार वस्त्रे विक्री करणाऱ्या या व्यावसायीकांनी सुमारे ५ ते ६ लाख रुपये किमतीचे लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंतची उबदार वस्त्रे पाठविली. सुमारे २ हजार लोकांना ही उबदार वस्त्रे वितरीत करण्याचा संकल्प आहे. त्याअंतर्गत बुधवारी तिबेटीयन वसाहत कार्यालयासमोर वितरण सुरू करण्यात आले.याचा जवळच्या खेडेगावातील लोकांनी लाभ घेतला. उर्वरित उबदार वस्त्रे ही शाळा व खेडेगावात प्रत्यक्ष जावून दिली जाणार आहेत.भारताने सर्वकाही दिलेभारत सरकार व भारतीय लोकं यांनी आम्हाला जे दिलं, ते कुणीही दिलं नाही. अगदी भरभरुन दिलं. देशवासी व स्थानिकांच्या सहकार्याने आम्ही येथे गुण्यागोविंदाने नांदत आहोत. चिनने तिबेटवर कब्जा केल्यानंतर आमच्या मातीत आम्हाला स्वातंत्र्य नाही. पण आम्ही भारत देशात अगदी स्वातंत्र्यात असल्यासारखेच आहोत. १० डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिनाचा वर्धापन दिवस याच दिवशी सर्वोच्च आध्यात्मिक धर्मगुरु दलाई लामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. या दिनाचे औचित्य साधून धन्यवाद मानन्याचे हेतूने ‘थँक यू इंडिया’ हा कार्यक्रम राबविला जात आहे.- ढुन्डूप ग्यान पोवसाहत अधिकारी, नार्गेलिंग तिबेटीयन वसाहत प्रतापगड