शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
4
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
5
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
6
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
7
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
8
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
9
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
10
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
11
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
12
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
13
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
14
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
15
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
16
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

तंमुसने फुलविला संसार

By admin | Updated: June 2, 2016 01:21 IST

सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) तंटामुक्त समितीने पुढाकार घेवून विवाह तुटलेल्या जोडप्याचा पुन्हा विवाह लावून दिला.

साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) तंटामुक्त समितीने पुढाकार घेवून विवाह तुटलेल्या जोडप्याचा पुन्हा विवाह लावून दिला. साखरीटोला येथील लक्ष्मण नरेश चुटे याचा रत्नमाला बुधराम मेंढे मु. पुराडा ता. देवरी हिचेशी काही दिवसापूर्वी विवाह जुळला होता. परंतु मुलीचे वडील बुधराम मेंढे हे लग्न लावून देण्यास उत्सुक नव्हते, टाळाटाळ करीत होते. शेवटी दोन्ही पक्षांनी लग्न तोडण्याचा निर्णय घेतला. मात्र मुलीच्या मनात त्याच मुलाशी प्रेम निर्माण झाले व तिने लक्ष्मणसोबतच विवाह करण्याचा ठाम निर्णय घेवून सरळ ती मुलाच्या घरी पोहोचली. दोघांनीही तंमुसकडे धाव घेऊन विवाह लावून देण्यास विनंती अर्ज केला. दोघेही सज्ञान असल्याने तंमुसचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण लांजेवार यांनी २९ मे २०१६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात दोघांचे लग्न लावून दिले.या वेळी सरपंच संगिता कुसराम, उपसरपंच पृथ्वीराज शिवणकर, ग्रा.पं. सदस्य वीणा गणवीर, डॉ. संजय देशमुख, पत्रकार रमेश चुटे, अशोक मेहर, क्रांती येटरे, संजय कुसराम, दौलत गिरी, ग्रामसेवक संतोष कुटे, संतोष चुटे, विजय लांजेवार, आशिष अग्रवाल उपस्थित होते. संचालन व आभार प्राचार्य सागर काटेखाये यांनी केले. लग्नप्रसंगी तंमुसकडून वर-वधूंना भांडी, कुंडी भेटवस्तू देण्यात आल्या. या वेळी मोठ्या संख्येने वऱ्हाडी उपस्थित होते.एका तुटलेल्या विवाहाला पुन्हा विवाह बंधनात अडकविणाऱ्या तंमुसचे सर्व स्तवरावरुन कौतुक होत आहे. (वार्ताहर)