शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

विनयभंग करणाऱ्यास तीन वर्षांचा सश्रम कारावास

By admin | Updated: June 10, 2017 02:12 IST

कपडे धुण्यासाठी जात असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करणाऱ्या ...

मुरपार येथील प्रकरण : पाच साक्षीदार तपासले लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कपडे धुण्यासाठी जात असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करणाऱ्या गावातीलच तरूणाला जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला आहे. सदर निकाल गुरूवारी (दि.८) सुनावण्यात आला आहे. सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील मुरपार हे गाव सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येते. गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी १२ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी कपडे धुण्यासाठी नदीवर जात होती. तिला गावातीलच आरोपी सुखदेव रघुनाथ शेंडे (२७) याने रस्त्यात अडविले व तिचा विनयभंग केला. प्रकरणी सालेकसा पोलिसांनी भादंवीच्या कलम ३५४ (अ) व बाल लैंगिक अत्याचार प्रतीबंधक अधिनीयम कलम ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी देवीदास इलमकर यांनी केला होता. या संदर्भात सरकारी वकील वसंत चुटे यांनी न्यायालयात पाच साक्षदार तपासले. प्रकरणी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी आरोपीला कलम १२ अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांची अधीक शिक्षा सुनावली आहे. तर कलम ३५४ अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांची अधीक शिक्षा सुनावली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी सीएमएस सेलचे राजकुमार कराडे यांनी काम बघितले.