गोंदिया : मुलींना त्रास देणाऱ्या तरुणांना समज दिली असता मुलींची छेड काढणाऱ्या तरुणांनी तिघांना मारहाण करून त्यांच्या घरातील साहित्यदेखील फेकफाक केले. ही घटना ४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घडली. गोंदियाच्या शास्त्री वॉर्डातील अभय किशोर कुमार कुंगवानी (१८) हे आपल्या मित्रासह रावन दहन मैदान सिंधी कॉलनी येथे गप्पा करीत बसले असताना त्यांच्या ओळखीच्या तीन मैत्रिणी त्यांच्याकडे आल्या. आपली छेड तीन मुले काढत आहेत असे सांगत असताना छेड काढणारे मुलेही त्या ठिकाणी आली. त्यांना त्रास का देता असे विचारले असता आरोपींनी त्यांना थापडबुक्क्यांनी मारहाण करून निघून गेले. पुन्हा काही वेळात ते तीन मुले आपल्या १० ते १२ साथीदारांन घेऊन त्या ठिकाणी आले. त्यांना अश्लील शिवीगाळ करून दगड व विटा यांना फेकून मारले. मोटारसायकलची तोडफोड केली. त्यानंतर रखी वल्लेच्या रा. हेमू कॉलनी यांच्या घरात घुसून सामानाची तोडफोड केली. रवी वलेच्चा व त्याच्या भावाला मारहाण केली. गोंदिया शहर पोलिसांनी त्या आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ३३६, ३३७, ४५२, २९४, ३२३, ५०४, ५०६, ४२७ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.
मुलींची छेड काढणाऱ्यांनी केली तिघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:29 IST