शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:23 IST

तिरोडा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज वाहतूक होत आहे. यावर आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे यांनी ...

तिरोडा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज वाहतूक होत आहे. यावर आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे यांनी एक पथक तयार केले आहे. या पथकाने रेतीची अवैध वाहतूक करणारे चांदोरी बु. रेती घाटातून एक तर मुरमाडी-मुरपार रस्त्यावर दाेन असे एकूण तीन ट्रॅक्टर-ट्राॅली जप्त करून तिरोडा तहसील कार्यालयात जमा केले आहे. ही कारवाई २६ व २७ मे रोजी करण्यात आली आहे.

तालुक्यात होत असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा बसावा, या उद्देशाने उपविभागीय अधिकारी नष्टे यांनी मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत पथकाद्वारे कारवाईचे सत्र सुरू आहे. यात, बुधवारी (दि. २६) सकाळी ११.३० वाजता चांदोरी बु. रेती घाटात १ ब्रास रेतीची विनापरवाना अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एआर ०५३० ला पथकाने पकडले. राजू किसन ठाकरे (रा. चांदोरी बु) असे वाहन मालकाचे नाव आहे.

तसेच गुरूवारी (दि. २७) सायंकाळी ६.३० वाजता पथक नवेझरी परिसरात गस्तीवर असताना दाेन ट्रॅक्टर रेती भरून मुरमाडी-मुरपार मार्गावरून येत असल्याचे दिसले. पथकाने ट्रॅक्टर थांबवून रेती वाहतुकीचा परवाना मागितला. मात्र आपल्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे ट्रॅक्टर चालकांनी सांगितले. त्यावरून ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६-०४९८ व ट्राॅली क्रमांक एमएच ३५-एफ २२१७ ने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या मोहनलाल टिकाराम बोंद्रे (रा. निलज खु.) व ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एजी १०६८ ने रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या नितीन वामन चकोले (रा. नवेगाव) यांच्यावर कारवाई करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. सर्व जप्त ट्रॅक्टर्स तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. ही कारवाई उपविभागीय अधिकारी नष्टे व तहसीलदार प्रशांत घोरूडे यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी प्रवीण रोकडे, तलाठी उगावकर, आनंद भूते, संजय वाकलकर यांनी केली.