शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

तीन तालुक्यांत अतिवृष्टी

By admin | Updated: August 7, 2016 00:48 IST

शुक्रवारी दिवसभर आणि रात्रभर झालेल्या पावसाने गोंदिया, तिरोडा आणि सालेकसा या तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली.

नागरिकांची तारांबळ : २४ तासांत ५९.४ मि.मी.पाऊस गोंदिया : शुक्रवारी दिवसभर आणि रात्रभर झालेल्या पावसाने गोंदिया, तिरोडा आणि सालेकसा या तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. शनिवारी पावसाने उसंत घेतली असली अनेक नाल्यांना पूर आल्याने काही मार्ग बंद झाले होते. सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात ५९.४ मिमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे गोंदिया शहरातील काही खोलगट भागातील घरांना पावसाच्या साचलेल्या पाण्याने वेढा दिला. याशिवाय ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांची अंशत: पडझड झाली. मात्र कुठेही जीवित हाणी झाल्याचे वृत्त नाही. गोंदिया शहरात अनेक मुख्य रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यातून वाहने काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. १ जून ते ६ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ६३६.१ मि.मी. पाऊस झाला आहे. सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार गोंदिया तालुक्यातील गंगाझरी मंडळ विभागात ५९ मि.मी., रतनारा मंडळात ९० मि.मी., दासगाव मंडळात ३३ मि.मी., रावणवाडी मंडळात ५० मि.मी., गोंदिया मंडळात १५५ मि.मी., खमारी मंडळात ४८ मि.मी., कामठा मंडळात ६२ मि.मी. असा मिळून गोंदिया तालुक्यात सरासरी ७१ मि.मी. पाऊस पडला. तिरोडा तालुक्यात परसवाडा मंडळ विभागात ६०.१ मि.मी., तिरोडा मंडळात ९३.७ मि.मी., मुंडीकोटा मंडळात ६२ मि.मी., वडेगाव मंडळात १०३ मि.मी., ठाणेगाव मंडळात ९८.२ मि.मी. पाऊस पडला. सर्व मंडळ मिळून तिरोडा तालुक्यात सरासरी ८३.४ मि.मी. पाऊस पडला आहे. सालेकसा तालुक्यात कावराबांध मंडळ विभागात ९६ मि.मी., सालेकसा मंडळात ६० मि.मी., साकरीटोला मंडळात ५४ मि.मी. असा एकूण सालेकसा तालुक्यात सरासरी ७० मि.मी. पाऊस पडला. या तीनही तालुक्यात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. इतर तालुक्यांमध्ये गोरेगाव तालुक्यात सरासरी ५२.८ मिमी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात २८.८ मिमी, देवरी तालुक्यात ३५.३ मिमी, आमगाव तालुक्यात ६०.५ मिमी आणि सडक अर्जुनी तालुक्यात ६१.८ मिमी असा पाऊस पडला आहे. (जिल्हा प्रतिनिधी) पुलांवरून वाहतेय पाणी सालेकसा : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे तालुक्यात अनेक जिल्हा मार्गावरील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहन असल्यामुळे काही गावाचा संपर्क आज दिवसभर तुटून राहीला. पाण्याच्या धोका लक्षात घेता अनेक गावातील लोकांनी गावाबाहेर जाण्याचे टाळले. अनेक दुर्घटनांच्या बातम्या पाहताना, वाचताना व ऐकताना लोकांनी आता येण्या-जाण्यात सावधपणा घेण्याकडे लक्ष देणे सुरू केले आहे. त्यामुळे अनेक नदीनाल्यांना पुर आला तरी लोक धोका पत्करायला मागे पुढे पाहत आले. आजचा शनिवार काम कामाचा असून सुध्दा तालुका मुख्यालयी अनेक कार्यालयामध्ये शुकशुकाट दिसून आला. कालपासून पडत असलेल्या पावसामुळे सालेकसा-तिरखेडी, सातगाव मार्ग, मक्काटोला-बिजेपार, गोवारीटोला-बाम्हणी, लटोरी-नवेगाव, पानगाव-सोनपुरी, जमाकुडो, कोपालगढ, चौकी, टोयागोंदी, निंबा-पाऊलदौना, पोवारीटोला-चिचटोला नवेगाव-बाम्हणी, सालेकसा-नानव्हा यासह जंगल भागातील अनेक मार्ग बंद झाल्याची माहिती मिळाली आहे. कुआढास नाला, धनेगाव नाला, दलदल कुही नाला, पोवारीटोाल नाला, टोयागोंदी नाला, कोपालगढ नाला, हाजराफाल नाला यांच्यासह पुजारीटोला धरणापासून वाघनदी आणि गल्लीटोला ते नवेगावकडे वाहणारी पूर्वी वाघ नदी दुथडी वाहून जात आहे. यानंतर ही पाऊस सुरूच राहीला तर काही गावामध्ये पुराचे पाणी शिरण्याची शक्यता वाढली आहे. (तालुका प्रतिनिधी)