शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांपासून जड वाहनांच्या येरझारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:13 IST

राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयांकडे वाहन तपासणी करण्यासाठी २५० मीटरचा ट्रॅक असावा अशा शासनाच्या सूचना आहेत. गोंदियाच्या ब्रेक टेस्ट ट्रॅक साठी जागा गोंदिया तालुक्याच्या मुरपार येथे देण्यात आली. यासाठी ३९ लाख १३ हजार ९८० रूपये मंजूर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देब्रेक टेस्ट ट्रॅक बनलेच नाही : आठ महिन्यांपासून काम रखडलेलेच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयांकडे वाहन तपासणी करण्यासाठी २५० मीटरचा ट्रॅक असावा अशा शासनाच्या सूचना आहेत. गोंदियाच्या ब्रेक टेस्ट ट्रॅक साठी जागा गोंदिया तालुक्याच्या मुरपार येथे देण्यात आली. यासाठी ३९ लाख १३ हजार ९८० रूपये मंजूर करण्यात आले आहे.मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील २७ कार्यालयांना १ नोव्हेंबर तारीख दिली होती. तर गोंदिया जिल्ह्याला सुरूवातीला ३१ जानेवारी २०१८ पर्यंत मुदत दिली. त्यानंतर पुन्हा न्यायालयाने ही तारीख वाढवून ३० जून पर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु दोन वेळा मुदत दिलेल्या तारखेत सार्वजनिक बांधकाम विभागाने ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार केले नाही. परिणामी गोंदियातील जड वाहनांना तपासणीकरीता भंडारा येथे १०० किमी दूर न्यावे लागत आहे.गोंदियाच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन तपासणी करण्यासाठी २५० मीटर लांबीचा ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करण्यासाठी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. हे ट्रॅक तयार करून द्यावे यासाठी गोंदियाच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने १९ वेळा स्मरणपत्र लिखित दिले. जेव्हा भेटी व्हायच्या तेव्हा यासंदर्भात चर्चा व्हायची परंतु कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांनी याकडे लक्ष दिले नाही.प्रत्येक प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन तपासणी करण्यासाठी २५० मीटर लांबीचा ब्रेक टेस्ट ट्रॅक असणे आवश्यक आहे. गोंदिया जिल्ह्याचे ब्रेक टेस्ट ट्रॅक सुरूवातीला गोरेगाव तालुक्यात तयार करण्यात येणार होते. परंतु जी जागा निवडण्यात आली होती, ती जागा झुडपी जंगल व गायरान असल्यामुळे ह्या जागेसंदर्भात कार्यवाही करता आली नाही.त्यानंतर गोंदिया तालुक्याच्या मुरपार येथील १.४० हेक्टर जागेवर ब्रेक टेस्ट ट्रॅक उभारण्यास मंजुरी देण्यात आली. ह्या ट्रॅकच्या निर्मितीसाठी ३१ जानेवारी २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ३० जून ही मुदत देण्यात आली. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग टेंडर प्रक्रियेत अडकले आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील जड वाहनांना तपासणीसाठी भंडारा येथे जावे लागत आहे.बॉक्समुख्य अभियंत्यांच्या आदेशाला केराची टोपलीब्रेक टेस्ट ट्रॅक करीता शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला ३९ लाख १३ हजार ९८० रूपये मंजूर करविण्यात आले.जागाही उपलब्ध करून देण्यात आली. परंतु गोंदियाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या ब्रेक टेस्ट ट्रॅक कामाला सुरूवात न केल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील जड वाहनांच्या तपासणीसाठी भंडारा जावे लागू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांनी बैठक घेऊन सदर ट्रॅक तयार करण्याचे आदेश दिले.परंतु त्यांच्या आदेशालाही कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम गोंदिया यांनी जुमानले नाही. बॉक्सराज्यात चारच ठिकाणी ट्रॅक नाही. राज्यात ४ ठिकाणी ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आले नाही. बीड, गोंदिया, अकलूज व ठाणे हे चारच असे ठिकाण आहेत.ज्या ठिकाणी ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार न केल्यामुळे येथील वाहनांना तपासणीसाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागते. एका वाहनाला भंडारा जाण्या येण्यासाठी अधिकचा ५ हजाराचा भूर्दंड बसत असल्याचे एका वाहन चालकाने सांगितले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस