शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तीन बाजार समित्यांचे ‘इलेक्शन’

By admin | Updated: July 6, 2015 01:24 IST

जिल्ह्यातील सात पैकी तीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांची पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे.

गोंदिया : जिल्ह्यातील सात पैकी तीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांची पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. यात आमगाव, अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी येथील बाजार समितीचा समावेश आहे. या तिन्ही बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येथील निवडणुकीच्या राजकारणाला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. लोकसभा, विधानसभा त्यानंतर नुकतेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. तर ग्राम पंचायतींच्या निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी असलेल्या या निवडणुकांसोबतच सहकारी संस्थांच्याही निवडणुका जोमात सुरू असून जिल्ह्यात निवडणुकीचा हंगाम चांगलाच रंगात आलेला आहे. निवडणुकीच्या धामधुमीला अधिक रंगतदार बनविण्यासाठी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका येत आहेत. जिल्ह्यात सालेकसा तालुका सोडून उर्वरीत सातही तालुक्यांत कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. या सात बाजार समित्यांमधील तीन बाजार समित्यांची निवडणूक आॅगस्ट महिन्यात होणार आहे. यात आमगाव, अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी बाजार समितीचा समावेश आहे. यातील आमगाव बाजार समितीच्या संचालकांचा कार्यकाळ २० आॅगस्ट २०१३ रोजी संपला आहे. सडक-अर्जुनी बाजार समितीचा कार्यकाळ ५ नोव्हेंबर २०१४ रोजी तर अर्जुनी-मोरगाव बाजार समितीचा कार्यकाळ १४ मार्च २०१५ संपला आहे. या तिन्ही बाजार समित्यांच्या निवडणुका जिल्हा उप निबंधकांच्या मार्फत घेण्यात येणार असून त्यांचा निवडणूक कार्यक्रमही जाहीर झालेला आहे. जिल्ह्यातील वजनदार बाजार समित्यांत या तिन्ही बाजार समित्यांचा समावेश होत असल्याने येथील निवडणुकीला घेऊन आतापासूनच राजकारणाला रंगत चढू लागली आहे. (शहर प्रतिनिधी)पहिल्या आठवड्यापासूनच निवडणूका आॅगस्ट महिन्यात तिन्ही बाजार समित्यांच्या निवडणुका होणार असून सुरूवातीपासूनच त्यांना तारखा देण्यात आल्या आहेत. यात सर्वप्रथम आमगाव बाजार समितीचा नंबर असून २ आॅगस्ट रोजी येथे निवडणूक होणार आहे. त्यानंतर १६ आॅगस्ट रोजी अर्जुनी-मोरगाव बाजार समितीची निवडणूक घेतली जाणार आहे. तर सर्वात शेवटी २३ आॅगस्ट रोजी सडक-अर्जुनी बाजार समितीची निवडणूक होणार आहे. आमगावात आले १०६ अर्ज बाजार समिती संचालकपदासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीतील आमगाव बाजार समितीकरिता अर्ज टाकण्याचा शेवटचा दिवस २३ जून देण्यात आलेला होता. त्यामुळे आता अर्ज टाकण्याची मुदत निघून गेली असून आमगाव बाजार समितीत शेवटच्या दिवसापर्यंत इच्छुकांकडून १०६ अर्ज आले असल्याची माहिती आहे. शिवाय अर्जुनी-मोरगाव बाजार समितीसाठी १० जुलैपर्यंत अर्ज सादर करता येतील. तर सडक-अर्जुनी बाजार समितीचा १५ जुलै अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक आहे. चार समित्यांवर प्रशासक नियुक्त जिल्ह्यत सात बाजार समित्या आहेत. यातील आमगाव, तिरोडा, सडक-अर्जुनी व देवरी या चार बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील तिरोडा बाजार समितीत झालेल्या भ्रष्टाचारामुळे तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करण्यात आल्याची माहिती आहे. तर गोंदिया, गोरेगाव व अर्जुनी-मोरगाव येथे प्रशासक नसून तेथे अध्यक्ष कार्यरत आहेत.