शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख नागरिक लसीकरणासाठी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी एकूण १४० केंद्रांवरून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत एक लाख आठ हजार २४७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यासाठी जवळपास ५८ हजार डोस जिल्ह्याला प्राप्त झाले. यात १४१६४ आरोग्य कर्मचारी, २०६२२ फ्रंटलाईन वर्कर, ४५३८१ ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील २९२४१ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यात एकूण ९५३७१ नागरिकांना पहिला डोस, तर १३२५४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात लसींचा तुटवडा : दोन दिवस करावी लागणार प्रतीक्षा : तीन लाख १८ हजार लसींची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाढत्या कोरोना संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी कोरोना लसीकरण प्रभावी उपाय समजले जात होते. यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला. लसीकरण मोहिमेला गती आली असतानाच आता जिल्ह्यात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने संपूर्ण १४० केंद्रांवरील लसीकरण मोहीम बुधवारपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी लसीकरणासाठी तीन लाख १५ हजार नागरिक वेटिंगवर असल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी एकूण १४० केंद्रांवरून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत एक लाख आठ हजार २४७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यासाठी जवळपास ५८ हजार डोस जिल्ह्याला प्राप्त झाले. यात १४१६४ आरोग्य कर्मचारी, २०६२२ फ्रंटलाईन वर्कर, ४५३८१ ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील २९२४१ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यात एकूण ९५३७१ नागरिकांना पहिला डोस, तर १३२५४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील जवळपास तीन लाख १५ हजार नागरिकांना कोरोना लसीकरण होणे बाकी आहे. यासाठी जवळपास तीन लाख १८ हजार लसींची गरज आहे. मात्र, मंगळवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील संपूर्ण लसींचा साठा संपल्याने बुधवारपासून लसीकरण माेहीम पूर्णपणे ठप्प करण्याची वेळ आली. जिल्हा आरोग्य विभागाने तीन हजार डोस शिल्लक होते तेव्हाच शासनाकडे दोन लाख ७८ डोसची मागणी केली होती. मात्र, पुणे येथून लसींचा पुरवठा झाला नसल्याने जिल्ह्याला लसींचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे आता जवळपास पाच दिवस लसीकरण ठप्प ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर आली.  

उद्यापर्यंत लस उपलब्ध होण्याची शक्यताआरोग्य विभागाने शासनाकडे दोन लाख ७८ हजार लसींची मागणी केली आहे. पुणे येथून लस आणण्यासाठी आज, शुक्रवारी गाडी जाणार असून उद्या, शनिवारी ती परतणार आहे. यानंतर उद्याच गोंदिया जिल्ह्याला लस मिळण्याची शक्यता आरोग्य विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

प्रतिसाद वाढत असतानाच ब्रेक जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेसाठी प्रशासनातर्फे व्यापक स्तरावर जनजागृती सुरू करण्यात आली होती. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणासाठी पुढे येऊ लागले होते. परिणामी दरराेज दहा हजारावर नागरिकांना लसीकरण केले जात होते. मात्र, अशातच लसींचा साठा संपल्याने लसीकरण मोहीम बंद करण्यात आली. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुरू आहे. केंद्रावरून परतले अनेकजण लसीकरणाला गती मिळावी यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व दहा खासगी रुग्णालयांत कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकसुद्धा मोठ्या प्रमाणात लसीकरणाला प्रतिसाद देत होते; पण अनेकांना लसींचा साठा संपल्याची माहिती नसल्याने केंद्रावरून लस न घेताच परतावे लागले. 

आरोग्य विभागाने शासनाकडे लसींची मागणी केली आहे. उद्या, शनिवारपर्यंत लसींचा साठा उपलब्ध होण्याची शक्यता असून, त्यानंतर पुन्हा युद्धपातळीवर लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल.- डॉ. संजय पांचाळ, लसीकरण अधिकारी.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस