चांदणीटोला, कटंगटोला परिसरात सहायक पोलीस निरीक्षक कुंदोजवार कर्मचाऱ्यांसोबत पेट्रोलिंग करीत असताना, चांदणीटोला येथील एक ३१ वर्षांची महिला दारू विक्री करीत असताना तिला पकडण्यात आले. कटंगटोला येथे विक्रम प्रकाश लिल्हारे हा आपल्या पान टपरीमध्ये देशी दारू विक्री करीत होता. त्याच्या घरातूनही ३९ नग देशी दारूचे पव्वे, १० लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. १४ जानेवारी रोजी दुपारी रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दासगाव परिसरात पेट्रोलिंग करीत असताना बबलू तिलकचंद डोंगरे हा पानटपरीत दारू विक्री करीत होता. पानटपरीत १० लिटर हा. भ. मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली. संबंधित पोलीस ठाण्यात आरोपी विरुध्द मुंबई दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तीन अवैध दारू विक्रेत्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:34 IST