शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव तालुक्यातील तीनशे कुटुंबे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 15:46 IST

आमगाव तालुक्यात विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे ग्राहकांना डिमांड भरल्यानंतरही विद्युत मीटर उपलब्ध करुन देण्यात आले नाही. परिणामी तालुक्यातील तिनशे कुटुंबाना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देविद्युत मीटर उपलब्ध नसल्याचा फटका वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतगोंदिया : आमगाव तालुक्यात विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे ग्राहकांना डिमांड भरल्यानंतरही विद्युत मीटर उपलब्ध करुन देण्यात आले नाही. परिणामी तालुक्यातील तिनशे कुटुंबाना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.शासनाच्या उर्जा विभागाच्या धोरणाअंतर्गत नागरीकांना विद्युत जोडणी त्वरीत मिळावी. यासाठी अर्जाची किचकट अट आणि नियम शिथील करुन विद्युत जोडणी त्वरीत देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे तिनशे कुटुंबाना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. एकीकडे याच विभागातर्फे वीज चोरीला आळा घालण्यासाठी त्वरीत वीज जोडणी करुन देण्याची मोहीम राबविली जात आहे. तर दुसरीकडे मात्र याच विभागाच्या दप्तर दिंरगाईचा वीज ग्राहकांना फटका बसत असल्याचे चित्र आहे. आमगाव तालुक्यातील काही गावांमधील वीज ग्राहकांना वीज जोडणी करुन देण्यात आली. तर जवळपास ३०० ग्राहकांना डिमांड भरुन देखील विद्युत मीटर देण्यात आले नाही. परिणामी या ग्राहकांना वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे. विद्युत मीटर बंद असणे, मीटर जलद गतीने फिरणे, मीटर बंद असून देखील रिडिंगमध्ये वाढ होणे आदी समस्यांमुळे वीज ग्राहकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. वीज वापरापेक्षा अधिक देयकाचा भरणा ग्राहकांना करावा लागत आहे. परंतु फाल्टी मीटर बदलण्याचे काम अद्यापही वीज वितरण कंपनीने सुरू केले नाही. नवीन विद्युत जोडणी मागणी करणाºया ग्राहकांना विद्युत मीटरचा स्टॉक उपलब्ध नसल्याचे सांगत जोडणी करुन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे डिमांड भरुनही त्यांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.

शासनाकडून विद्युत मीटरची खरेदी झाली नसल्याने विभागात नवीन विद्युत मीटर उपलब्ध नाहीत. मीटरची मागणी करण्यात आली आहे. उपलब्ध होताच पुरवठा करण्यात येईल.- सरोज परिहार,उपविभागीय अभियंता विद्युत वितरण विभाग आमगाव.

टॅग्स :Governmentसरकार