शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खुर्शीपार जंगलात तीन हरणांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:21 IST

आमगाव वन परिक्षेत्रातर्गंत येणाऱ्या मानेगाव क्षेत्रातील खुर्शीपार जंगलात तीन हरिणांची शिकार अज्ञात शिकाऱ्यांनी केल्याची घटना शनिवारी (दि.१७) सकाळी उघडकीस आली. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

ऑनलाईन लोकमतआमगाव : आमगाव वन परिक्षेत्रातर्गंत येणाऱ्या मानेगाव क्षेत्रातील खुर्शीपार जंगलात तीन हरिणांची शिकार अज्ञात शिकाऱ्यांनी केल्याची घटना शनिवारी (दि.१७) सकाळी उघडकीस आली. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.प्राप्त माहितीनुसार मानेगाव हे जंगलव्यापत क्षेत्र असून शुक्रवारी (दि.१६) एक शेतकरी जंगलाच्या मार्गाने शेतात जात असताना खुर्शीपार येथील गौरीशंकर ठाकरे यांच्या शेतशिवारात तीन हरिण मृतावस्थेत आढळले.त्यांनी याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी ताफ्यासह पोहचले. तेव्हा त्यांना तीन हरिण मृदावस्थेत पडून असल्याचे आढळले. त्यापैकी दोन हरिणांचे शिंगे कापलेले आढळले.मृत हरिणांची स्थिती पाहता, त्यांचा विजेच्या प्रवाहाने मृत्यू झाला नसावा. तर त्यांचा मृत विष बाधेमुळे झाला असावा असा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने यांनी व्यक्त केला. हरिणांची शिकार करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध घेण्यास पथके रवाना केली आहे.मात्र तीन हरिणांपैकी दोन हरिणांचे शिंगे गायब असल्याने कदाचित जादूटोण्यासाठी या हरिणांची शिकार तर करण्यात आली नाही ना अशी शक्यता वर्तविली जात आहे.दोन दिवसांपूर्वीची घटना ?खुर्शीपार जंगलात तीन हरिणांची शिकार झाल्याची घटना गुरूवारी घडल्याची चर्चा आहे. याची माहिती सुध्दा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना होती. मात्र त्यांनी ही बाब उशीर उघडकीस आणल्याची चर्चा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.