शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटींचे चुकारे अडले

By admin | Updated: July 22, 2015 02:00 IST

आदिवासी विकास महामंडळाने शासकीय आधारभूत हमी भाव दराने शेतकऱ्यांचे खरेदी केलेल्या उन्हाळी धानाचे अद्यापही चुकारे मिळाले नसल्याने ...

आर्थिक संकट : धान उत्पादकांची उपासमारअर्जुनी-मोरगाव : आदिवासी विकास महामंडळाने शासकीय आधारभूत हमी भाव दराने शेतकऱ्यांचे खरेदी केलेल्या उन्हाळी धानाचे अद्यापही चुकारे मिळाले नसल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आधीच धानाला भाव नसतानाही अडचणीपोटी विक्री केलेल्या धानाचे चुकारे अडल्याने शेतकऱ्यांची उपासमार होत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या अधिकाऱ्यांनी तातडीने चुकाऱ्यांची व्यवस्था करण्याची मागणी प्रतापगड येथील गोपीनाथ दरवडे यांनी केली आहे.प्राप्त माहितीनुसार, शासनाने आदिवासी महामंडळ व सहकारी संस्थाच्या माध्यमातून उन्हाळी धान पिक खरेदी ३० जूनपर्यंत केली. आदिवासी महामंडळामार्फत १ हजार ३६० रुपये हमी भावाप्रमाणे १८ हजार २५६ क्विंटल धान खरेदी केली. या खरेदीचे मूल्य २ कोटी ४८ लाख २८ हजार १६० रुपये होते. शिवाय ४५ लाख ६४ हजार १४० रुपयांचे सानुग्रह अनुदान आहे. असे एकूण सुमारे ३ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे चुकारे शिल्लक आहेत. या रकमेच्या हुंड्या बँकेत वटविल्या असूनही बँकेमार्फत अद्यापही चुकारे देण्यात आले नाहीत.याविषयी संस्थेचे उपाध्यक्ष गोपीनाथ दरवडे यांनी ११ जुलै रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत हा विषय चर्चेला आणून ठरााव पारित केला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांना या ठरावाची प्रत दिली व शासनस्तरावर महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांचेकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)