शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने कटून तिघांचा मृत्यू

By admin | Updated: May 14, 2017 00:35 IST

वेगवेगळ्या दोन घटनेत रेल्वेने कटून तिघांचा मृत्यू झाला आहे. एका घटनेत दोन भावंडाचा तर दुसऱ्या घटनेत

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : वेगवेगळ्या दोन घटनेत रेल्वेने कटून तिघांचा मृत्यू झाला आहे. एका घटनेत दोन भावंडाचा तर दुसऱ्या घटनेत एकाचा मृत्यू झाला. गोंदिया-बालाघाट रेल्वे रूळावर ह्या दोन्ही घटना घडल्या. नागपूरवरुन गोंदिया येथे मावश बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्या दोन भावांचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास कटंगी गावाजवळ मृत्यू झाला. मृतांमध्ये उमेश अर्जुन बिजेवार (२३) व रितेश अर्जुन बिजेवार (१८) दोन्ही रा. वानाडोंगरी नागपूर अशी मृतांची नावे आहेत. नागपूर येथील उमेश आणि रितेश हे दोघेही आपल्या नातेवाईकांकडे स्वागत सभारंभासाठी नागपूरवरुन गोंदियाला आले होते. गोंदिया जवळील अंगूर बगीचा परिसरात सभारंभ आयोजित होता. याच ठिकाणाहून गोंदिया-बालाघाट रेल्वे मार्ग आहे. लग्न सभारंभात सहभागी झाल्यानंतर हे दोघे भाऊ रेल्वे ट्रॅकवर जाऊन बसले. सभारंभाचे ठिकाण रेल्वे ट्रॅकजवळ असल्याने सभारंभातील आवाज सुरु असताना बालाघाट वरून गोंदियाकडे येणाऱ्या गाडीने गुरुवारच्या रात्री १० वाजताच्या सुमारास या दोघांना धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दोघांचेही मृतहेद जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दुसरी घटना शनिवारच्या सकाळी ९.३० वाजता कटंगी रेल्वे क्रॉसिंग जवळ घडली. कटंगीटोला येथील प्रकाशसिंह दादू तलवार (४२) यांचा रेल्वेने कटून मृत्यू झाला. शिवनगर गोंदिया येथील राखी चंदन भारद्वाज (३८) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.