शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राहुलच्या तीन मारेकऱ्यांना अटक

By admin | Updated: August 9, 2014 00:53 IST

गोंदिया शहरात जमिनीची दलाली करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या मामा चौकातील राहूल धनराज खोब्रागडे (३३) याचा पैशाच्या वादातून तिघांनी खून केला.

गोंदिया : गोंदिया शहरात जमिनीची दलाली करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या मामा चौकातील राहूल धनराज खोब्रागडे (३३) याचा पैशाच्या वादातून तिघांनी खून केला. महिनाभरानंतर राहुल खोब्रागडे प्रकरणातील आरोपींना पकडण्यात गंगाझरी पोलिसांना यश आले. ६ जुलैच्या सायंकाळपासून तो बेपत्ता राहुल खोब्रागडे बेपत्ता झाला होता. होता. शहराच्या एनएमडी कॉलेजजवळील एका दुकानासमोर त्याचे वाहन आढळले. ८ जुलै रोजी गोंदिया शहर पोलिसात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली.राहूल धनराज खोब्रागडे रविवारच्या सायंकाळी ७.३० वाजता तो घराबाहेर पडला. त्याची मोटारसायकल एमएच ३५/ व्ही-८८१६ ही एनएमडी कॉलेजजवळील नर्सिग झेरॉक्स समोर पडलेल्या अवस्थेत आढळली. नातेवाईकांनी दोन दिवसापासून शोध घेतला. परंतु त्याचा पत्ता लागला नाही. रविवारच्या रात्री १०.३२ वाजता पर्यंत त्याच्या मोबाईलवर बेल जात होती. राहुल खोब्रागडेचे दोन लाख रुपये प्रमोद रामाजी कापगते (२४) रा. गांधी वॉर्ड गोंदिया याच्यावर होते. या पैशाच्या कारणावरून प्रमोद कापगते व राहुल खोब्रागडे यांच्यात बाचाबाची व्हायची. ४ जुलै रोजी प्रमोद व राहुल यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी राहुलने प्रमोद कापगतेला मारहाण केली होती. त्यानंतर ५ जुलै रोजी पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची होवून धक्काबुक्की झाली. यानंतर ५ जुलैच्या सायंकाळी प्रमोद कापगतेने मनोहर चौक गोंदिया येथील करण राधेश्याम अग्रवाल (२६) याच्या दुकानात बसून राहुल खोब्रागडेचा काटा कसा काढायचा याचा नियोजन केला. ६ जुलै रोजी दुपारी नमाद महाविद्यालयासमोर बोलावून पैसे सायंकाळी देतो असे सांगण्यात आले. सायंकाळी एमएच ३५/४०७१ मध्ये प्रमोद कापगते, श्रीनगराच्या चंद्रशेखर वॉर्डातील हरिश टिकाराम पराते (२४) व करण राधेश्याम अग्रवाल (२६) हे तिघेही एनएमडी कॉलेजसमोर आले. तेथे राहुलची त्यांच्यासोबत भेट झाली. त्याची दुचाकी तिथच ठेवून त्याला इंडिकात बसवले. गंगाझरी येथील एक इसम आपल्याला पैसे देणार आहे त्यासाठी तू पैसे घ्यायला चल असे म्हटल्यावर राहुल त्यांच्या गाडीत बसला. गाडी गंगाझरीच्या दिशेने निघाली. मुंडीपार एमआयडीची परिसर येताच त्या गाडीत बसलेल्या हरिष परातेने संडास लागल्याचे सांगून वाहन थांबविले. यावेळी सगळे गाडीबाहेर आले व चाकूने मारून राहुलचा खून केला. त्याच्या खूनाचे पुरावे नष्ट करण्याचा आरोपीने प्रयत्न केला. या संदर्भात पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक नन्नावरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी माहिती काढून गंगाझरी पोलिसांच्या मदतीने या आरोपींना अटक केली. ठाणेदार सुरेश कदम व विशेष पथकाने केलेल्या कारवाईत या तिघांना अटक करण्यात आली. सदर आरोपींना न्यायालयाने १६ आॅगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (तालुका प्रतिनिधी)