शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या सिग्नलचे रिले चोरी करणारे तीनजण जाळ्यात; गंगाझरी पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाची संयुक्त कारवाई

By नरेश रहिले | Updated: October 18, 2023 14:23 IST

ही कारवाई १५ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

नरेश रहिले

गोंदिया : गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दांडेगाव येथील लेव्हल रेल्वे क्रॉसिंग गेट ५१५ येथील रिले रूमचे कुलूप तोडून रेल्वे रॅक मधील ४१ रिले चोरी करणाऱ्या तिघांना गंगाझरी पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी संयुक्तरीत्या कारवाई करून अटक केली. ही कारवाई १५ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. सलाम रफिक शेख (२४), जितेंद्र ऊर्फ जितू नरेंद्र गिरी (३४), ऋषभ ऊर्फ सोनू शशिकांत सिंह (२४) सर्व रा. गंगाझरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. सोबतच एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले.

प्राप्त माहितीनुसार १४ ऑक्टोबर रात्री ११:३० वाजताच्या सुमारास चोरट्यांनी लेव्हल रेल्वे क्रॉसिंग गेट ५१५, दांडेगाव येथील रिले रूमचे कुलूप तोडून रेल्वे रॅक मधील ४१ रिले किंमत ९८ हजार रुपयांचा माल चोरून नेला होता.

या आरोपींवर गोंदिया रेल्वे सुरक्षा बल येथे आरोपींवर रेल्वे मालमत्ता (अवैध ताबा) कायदा १९६६ कलम ३ (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन गंगाझरीचे पोलिस निरीक्षक महेश बन्सोडे, सहायक फौजदार मनोहर अंबुले, पोलिस हवालदार सुभाष हिवरे, भूपेश कटरे, पोलिस शिपाई प्रशांत गौतम, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक अनिल पाटील, नंदबहादूर, विनोदकुमार तिवारी, पोलिस उपनिरीक्षक राहुल कुमार, दुबे, मेश्राम, सहायक फौजदार एस. सिडाम, पोलिस हवालदार रायकवार, पोलिस शिपाई नसीर खान यांनी केली. घटनास्थळाला रेल्वे सुरक्षा बलाचे डी.आय.जी भवानी शंकरनाथ व मंडल सुरक्षा आयुक्त आर्य यांनी भेट दिली.वाहतूक व्यवस्था खोळंबली

रेल्वेच्या महत्वपूर्ण सिग्नल प्रणालीच्या रिले चोरीच्या घटनेमुळे काही काळाकरिता हावडा - नागपूर रेल्वे मार्गावरील रेल्वेची वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. या कृत्यामुळे रेल्वेची मोठी दुर्घटना होता होता थोडक्यात टळली.

रिलेचे कार्य काय?

रिले हे रेल्वेच्या सिग्नल प्रणालीमध्ये वापरले जातात. त्याच्यामुळे सिग्नलचे कार्य चालू राहते. परंतु ते रिले सिस्टीम मधून काढल्यामुळे रेल्वेचे सर्व सिग्नल बंद पडले. यामुळे एखादी मोठी रेल्वे दुर्घटना घडून त्यात मोठी जीवित किंवा वित्तहानी झाली असती. परंतु रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या निर्देशानुसार गंगाझरीचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी तत्परतेने चोरट्यांबद्दल माहिती संकलित करून गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेण्यात आले.नागरिकांना आवाहन

रेल्वेच्या मालमत्तेची किंवा त्याच्या वेगवेगळ्या साहित्याची चोरी करणे हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारच्या रेल्वेच्या साहित्याच्या चोरीमुळे रेल्वेची मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे रेल्वेच्या मालमत्तेची चोरी केल्याचे वा करताना आढळून आल्यास त्याबद्दल तत्काळ गोंदिया रेल्वे पोलिसांना तसेच गोंदिया जिल्हा पोलिसांना माहिती देणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. जिल्ह्यांतील सुज्ञ नागरिकांनी नियंत्रण कक्ष गोंदिया दूरध्वनी क्रमांक ०७१८२-२३६१०० यावर किंवा डायल ११२ यावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.