एलसीबीची कारवाई : जुन्या वादाचा काढला वचपागोंदिया : सौंदड येथील रेल्वे लाईनवर ८ मार्च रोजी भरत परसराम देशकर (३५) रा.सौंदड यांचा मृतदेह आढळला. ही घटना आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न होता, मात्र नागरिकांनी पुढाकार घेतल्यामुळे ही घटना खून म्हणून उघडकीस आली. या घटनेतील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारच्या रात्री ११.५४ वाजतादरम्यान अटक केली.खुशाल बाजीराव मडावी (२८), निरेश भाऊराव ब्राम्हणकर (२२) व मंगेश चैतराम ब्राम्हणकर (३०) सर्व रा. सौंदड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मृतक भरतने खुशाल याच्याकडून पाच हजार रूपये घेतले होते. परंतु ते पैसे परत देत नव्हता. त्याचा राग खुशालच्या मनात होता. दरम्यान नितेश व भरत या दोघांचा कटकवार यांच्या लग्नात वाद झाला होता. त्या वादाचा वचपा काढण्यासाठी या तिन्ही आरोपींनी ८ मार्चच्या रात्री भरतचा काटा काढण्याचा चंग बांधला. त्याला काठ्यांनी ठार करून त्याची आत्महत्या वाटावी म्हणून रेल्वे रूळावर नेऊन टाकले. या घटनेसंदर्भात डुग्गीपार पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर नागरिकांनी हे प्रकरण आत्महत्या नसून खून असल्याची ओरड सुरू केल्यावर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला. सदर आरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण नावडकर, सहाय्यक फौजदार सुधीर नवखरे, हवालदार रामलाल सार्वे, तुलसीदास कुटे, अर्जुन कावळे, धनंजय शेंडे, संतोष काळे, पोलीस उपदिरीक्षक प्रकाश पाटील, डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)
भरतच्या खुनातील तिघांना अटक
By admin | Updated: March 26, 2016 01:40 IST