शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

खोडशिवणी खून प्रकरणातील तीन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

सडक अर्जुनी : तालुक्यातील म्हसवानी येथील खुमराज बलिराम रहांगडाले यांचा १३ जून रोजी सायंकाळी खोडशिवणी म्हसवानी मार्गावर खून करण्यात ...

सडक अर्जुनी : तालुक्यातील म्हसवानी येथील खुमराज बलिराम रहांगडाले यांचा १३ जून रोजी सायंकाळी खोडशिवणी म्हसवानी मार्गावर खून करण्यात आला होता. याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना गुरुवारी (दि. १७) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये योगेश फागुलाल बोपचे (२७) मरघट रोड बजाज वाॅर्ड, गोंदिया, निवासी पोमेश पन्नालाल पटेल (२५) यांच्यासह अन्य एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार म्हसवानी येथील खुमराज बलिराम रहांगडाले हे १३ जून रोजी सायंकाळी आपल्या आजारी मुलीला औषध आणण्यासाठी खोडशिवणी येथे गेले होते. मात्र, ते घरी परतलेच नाहीत. दरम्यान, त्यांचा मृतदेह खोडशिवणी - म्हसवानी मार्गावर आढळला होता. शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचा खून करण्यात आल्याची बाब पुढे आल्यानंतर याप्रकरणी आरोपी विरूद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये दाखल करण्यात आला. यानंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. तपासादरम्यान मृतक व आरोपी यांच्यामध्ये जमिनीवरुन वाद सुरू असल्याची माहिती मृतकाचा मुलगा निखिल खुमराज रहांगडाले व मुलगी दामिनी उर्फ स्वाती यांनी दिली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे या दिशेने फिरविली. योगेश‌ बाबूलाल बोपचे याची चौकशी करून विचारपूस केली असता त्याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने खुमराज रहांगडाले याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्या दोन्ही आरोपींशी चौकशी केली असता त्यांनी यात सहभागी असल्याची कबुली दिली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सफौ. कापगते, लिलेंद्र बैस, पोहवा राजेंद्र मिश्रा, पोना. तुरकर, बिसेन तथा चालक पांडे यांनी केली.