शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठार मारण्याची दिली धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST

................... झाड तोडून फेकणाऱ्यांनी दिली धमकी गोंदिया : शहराच्या संजयनगर जोगलेकर वाॅर्डातील नर्गीस ऊर्फ राणी शेरअली सय्यद यांच्या दर्ग्यासमोर ...

...................

झाड तोडून फेकणाऱ्यांनी दिली धमकी

गोंदिया : शहराच्या संजयनगर जोगलेकर वाॅर्डातील नर्गीस ऊर्फ राणी शेरअली सय्यद यांच्या दर्ग्यासमोर लावलेले झाड आरोपी आसीफ सरीफ शेख (४५) व अनिषा आसीफ शेख (४०) दोन्ही संजयनगर गोंदिया यांनी २८ ऑगस्ट रोजी त्यांच्या दर्ग्यासमोर लावलेले झाड तोडून टाकले. यासंदर्भात त्यांनी विचारणा केली असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे, तर अनिषा आसीफ शेख यांच्या तक्रारीवरून राणी शेरअली सय्यद (४०) हिने शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली, म्हणून राणीविरुद्ध भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

..........................

सोबत जाण्यास नकार देणाऱ्या तरुणीला मारहाण

गोंदिया : शहराच्या गौशाला वाॅर्डातील आरोपी शशांक विजयसिंग गहलोत (२३) याने माताटोली राजेंद्र वाॅर्डातील १९ वर्षांच्या तरुणीला २७ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता आपल्या सोबत येण्यासाठी म्हटले होते. त्या दोघांत मैत्री असून, तिने रात्रीच्या वेळेस जाण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने तिला शिवीगाळ करून थापडबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेसंदर्भात २८ ऑगस्ट रोजी रात्री गोंदिया शहर पोलिसांत भादंविच्या कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

.......................

महिलेला मारहाण दोघांवर गुन्हा दाखल

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लालपहाडी मुर्री येथील पुष्पा बंडू नेवारे (४४) यांच्या मुलाला आरोपी राज लहरे (१८) व ओमकार लहरे (४८) या दोघांनी मारहाण केली. माझ्या मुलाला मारहाण का केली म्हणून विचारण्यासाठी गेलेल्या पुष्पा बंडू नेवारे या महिलेला २७ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता दोन्ही आरोपींनी शिवीगाळ करीत थापडबुक्क्यांनी मारहाण केली. पुढे ठार करण्याची धमकी दिली. या घटनेसंदर्भात २८ ऑगस्ट रोजी गोंदिया शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

..................