शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

रिसामा तलावातील हजारो माशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 21:22 IST

तालुक्यातील रिसामा परिसरातील गायत्री मंदिराजवळील तलावातील हजारो मासे अचानक मृत्यूमुखी पडल्याची घटना गुरुवारी (दि.३०) सकाळी उघडकीस आली. गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

ठळक मुद्देमत्स्य व्यावसायिकांचे नुकसान : नुकसान भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील रिसामा परिसरातील गायत्री मंदिराजवळील तलावातील हजारो मासे अचानक मृत्यूमुखी पडल्याची घटना गुरुवारी (दि.३०) सकाळी उघडकीस आली.गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. तालुक्यातील रिसामा परिसरातील गायत्री मंदिर जवळील खाजगी तलाव महापात्र भावंडांनी मागील अनेक वर्षांपासून मासेमारीसाठी लिजवर घेतले आहे. याच व्यवसायावर त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. शिवाय त्यांच्या या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार सुध्दा मिळाला आहे.बुधवारी (दि.२९) सायंकाळच्या सुमारास तलाव मासे मृत्यूमुखी पडल्याची माहिती काही नागरिकांना महापात्र बंधुना दिली. त्यांनी मृत्यूमुखी पडलेले मासे बाहेर काढले.मात्र त्यानंतर गुरूवारी सकाळी तलावातील संपूर्ण मासे मृत्यूमुखी पडल्याचे आढळले.जवळपास ३५ ते ४० क्विंटल मासे मृत्यूमुखी पडल्याने महापात्र बंधूचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. यामुळे तलावातील पाणी सुध्दा दूषीत झाले आहे. या तलावाच्या साठवण क्षमतेच्या तुलनेत सध्या स्थितीत १५ ते २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र यानंतरही मासे मृत्यूमुखी पडल्याने तलावातील पाण्याची तपासणी केल्यानंतरच मासे कशामुळे मृत्यूमुखी पडले याचे कारण स्पष्ट होईल. तज्ज्ञांच्या मते पाणी साठा कमी झाला असता अथवा पाण्यातील आॅक्सीजनचे प्रमाण कमी झाले असता मासे मृत्युमुखी पडतात.मात्र तलावात सध्या स्थितीत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असून यानंतरही मासे मृत्त्युमुखी पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तलावात काहीतरी विषारी रसायन टाकल्याने मासे मृत्युमुखी पडल्याचे बोलल्या जाते. मत्स्य व्यवसाय विकास विभागाने याची चौकशी करुन महापात्र बंधूना आर्थिक मदत देण्याची मागणी आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमार