शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दारूच्या बाटल्या बाहेरच्या लोकांच्या

By admin | Updated: February 22, 2017 00:20 IST

जयस्तंभ चौकातील वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात सोमवारी आढळलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांशी

उपवनसंरक्षक रामगावकर : महिनाभरात कार्यालयच हलविणार गोंदिया : जयस्तंभ चौकातील वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात सोमवारी आढळलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांशी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संबंध नसून कार्यालयाबाहेरील दारूड्या लोकांचे ते कृत्य आहे, असे उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मंगळवारी सदर बातमी सचित्रपणे लोकमतला आणि व्हिडीओसह लोकमत आॅनलाईन आवृत्तीत प्रकाशित झाल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. वरिष्ठ स्तरावरूनही यासंदर्भात वनाधिकाऱ्यांना विचारणा झाल्याची माहिती आहे. दरम्यान हा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी कोणती काळजी घेणार याबाबत उपवनसंरक्षक रामगावकर यांना विचारणा केली असता त्यांनी आपल्या कार्यालयाच्या आवारात कोणतेही कर्मचारी रात्री वगैरे मद्यप्राशन करीत नसल्याचे सांगितले. मात्र कार्यालयाच्या मागील बाजुकडील वाहनांसाठी असलेले गेट जयस्तंभ चौकात उघडते आणि तिथेच दारू दुकान आहे. त्यामुळे बाहेरील लोक कधी उघड्या असणाऱ्या त्या फाटकातून आत येऊन मद्यप्राशन करून तिथे रिकाम्या बाटल्या टाकत असण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तविली. रात्रीला चौकीदार राहात असला तरी तो एकटा सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे वनविभागाचे हे कार्यालय अवघ्या महिनाभरात कायमस्वरूपी अशा आपल्या स्थायी जागेत स्थानांतरित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)