शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ भावडांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

By admin | Updated: November 1, 2016 01:06 IST

माणुस कोणत्याही आर्थिक लाभाच्या तसेच प्रतिष्ठेच्या मोठ्या पदावर विराजमान असला तरी

कपडे व मिठाईचे वाटप : शिक्षणाधिकाऱ्यांच्या सौभाग्यवतीने दिली अनाथांना ममता बोंडगावदेवी : माणुस कोणत्याही आर्थिक लाभाच्या तसेच प्रतिष्ठेच्या मोठ्या पदावर विराजमान असला तरी त्यांच्यामध्ये सामाजिक बांधीलकीची भावना जागृत झाली तर ती व्यक्ती अंतर्मनातून त्या दु:खात सहभागी होऊन आपल्या परीने मदत केल्याशिवाय राहात नाही. याचाच प्रत्यय बाक्टी येथील आई-वडिलांचे छत्र हरविल्याने अनाथ झालेल्या भावंडांना आला. बाक्टी येथील त्या दोन भावडांचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड यांनी कामाच्या व्यस्ततेमुळे आपल्या सौभाग्यवतींना प्रत्यक्षात बाक्टी येथे त्यांच्या राहत्या घरी पाठवून दिवाळीपूर्वी दोघा भावांना कपडे, मिठाई व रोख मदत करून त्या अनाथांना मायेची ऊब दिली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाक्टी येथील स्नेहा दिनेश मेश्राम (१४), विराज (८) या बालवयातील दोघा भावंडाचे आई-वडील मरण पावले. एकाएकी जन्मदात्या मायबापाचे कृपाछत्र हरवल्याने ते दोघेही भाऊ अनाथ झाले. १४ वर्षाची असलेली स्नेहा हीच्यावव लहान भाऊ व ८० वर्षाची असलेली आजी याची जबाबदारी आली. हसण्या-बाळगण्याच्या दिवसामध्ये त्या भावडांवर अनाथ होण्याची पाळी आली. दोघा बहीण-भावडांना समाजातील सृजनशील सामाजिक कार्यकर्त्यांकडून काही आधार मिळावा म्हणून लोकमतच्या माध्यमातून त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीचे गांभीर्य प्रकाशीत करण्यात आले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन यापूर्वी गोंदियाच्या प्रा. सविता बेदरकर यांच्या सहकार्याने अन्नधान्य, कपडे व रोख १५ हजार रुपयाची मदत करण्यात आली होती. यादरम्यान शिक्षणाधिकारी उल्हास नरड याचेही मन हेलावून गेले. बाक्टी येथील जि.प.प्राथमिक शाळेतील शिक्षक कैलास हाडगे यांचेशी भ्रमणध्वनीवरून बोलून त्या अनाथांचे सांत्वन करण्याची तयारी दर्शविली. दीपावलीच्या उत्साहात त्या अनाथ भावडांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून ममतेचा आभास व्हावा म्हणून त्यांनी पत्नी शुभांगी यांना बाक्टी-चान्ना येथे त्या अनाथ भावंडाकडे गुरूवारला (२७) पाठविले. त्या स्नेहा, विराज यांच्या घरापर्यंत आल्या. शुभांगीताईने मोठ्या आस्थेनी दोघाही भावडांची विचारपूस करून ममत्वाची ऊब त्यांना दिली. एक ध्येय समोर ठेवून दोघेही बहीण-भाऊ शिक्षण घ्या, अडचण आल्यास आधार देऊ असा दिलासा दिला. शुभांगीताईनी त्यांना कपडे व गोड तोंड करून आर्थिक मदत केली. यावेळी प्राथ. शाळेच्या मुख्याध्यापिका मिना लिचडे, छाया मदने, माजी सरपंच सुभाष मेश्राम, स.शि.कैलास हांडगे, मोटघरे प्रामुख्याने उपस्थित होते. त्या अनाथ भावंडाचे वास्तव चित्र दैनिक लोकमतने प्रकाशित केल्याने आर्थिक आधार मिळाल्याने प्रा. सविता बेदरकर यांनी लोकमतचे आभार मानले. (वार्ताहर)