शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

जिल्हा प्रशासनाच्या रुपात त्या बालकांना मिळाले विठ्ठल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST

संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव : माय-बाप गमावल्यानंतर त्या निरागस बालकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन धावून आले. २० कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी पाचशे ...

संतोष बुकावन

अर्जुनी मोरगाव : माय-बाप गमावल्यानंतर त्या निरागस बालकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन धावून आले. २० कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे त्या बालकांना एक वर्षांपर्यंत दरमहा दहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या रुपात त्यांना विठ्ठलच मिळाले. या मदतीमुळे पुन्हा एकदा जिल्हावासीयांना सहृदयतेचा प्रत्यय आला.

अर्जुनी मोरगाव येथील कोलते दाम्पत्याचा पाच महिन्यांत मृत्यू झाला. ‘लोकमत’ने ‘‘आई गेली, बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला’’ या शीर्षकाखाली शनिवारच्या (दि.३) अंकात वृत्त प्रकाशित केले. वृत्त वाचून गोंदियाचे जिल्हाधिकारी राजेश खवले यांचे मन हेलावले. त्यांनी त्या निरागस बालकांच्या मदतीसाठी आवाहन केले अन्‌ मदतीचा ओघ सुरू झाला. मदतीच्या या ओघामुळे जिल्ह्यात सकारात्मकतेचे वारे वाहत असल्याची प्रचिती येत आहे. अर्जुनी मोरगाव येथे अनाथ झालेल्या मुलांच्या मदतीसाठी सरकारी अधिकारी नाथ बनून धावून आले होते. सालेकसा तालुक्यातील मोहोरे कुटुंबाच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी त्या लहान मुलींचे भाऊ बनून धावून आले होते. गोरेगाव तालुक्यातील खडीपार गावामध्ये जेव्हा दोन चिमुकल्या बालिकांनी त्यांचे आईवडील गमावले आणि ८० वर्षाच्या वृद्ध आजीवर त्या दोन निरागस बालिकांचा सांभाळ करण्याची पाळी आली. तेव्हा जिल्हा प्रशासनातील अधिकारी त्या आजीचे मुले बनले आणि त्यांनी मदत केली. रक्ताचा मुलगा गमावलेल्या त्या आईला तब्बल २१ क्लास वन अधिकारी मुले म्हणून मिळालीत.

..........

हे कर्मचारी आले धावून

‘ लोकमत’ने ही व्यथा प्रकाशित केल्यानंतर गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी मदतीकरिता पुढे यावे, असे आवाहन केले आणि या आवाहनाला प्रतिसाद देत किशोर राठोड, राजेश मेनन, आकाश चव्हाण, धोंडिराम कातकडे, पुरवठा विभागाचे हांडे, तलाठी रवीकुमार नरेंद्रकुमार गुप्ता, नरेश तागडे, एन. ए. शेख, रवींद्र तितरे, पुंडलिक कुंभरे, शैलेस नंदेश्वर, व्याखाता प्रवीण गेडाम, राज्य उत्पादन शुल्क विभाग देवरीचे दुय्यम निरीक्षक सुहास झांजुर्णे, केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे स्वीय सहायक मोहन साठे, मंडळ अधिकारी एन. बी. वर्मा, महसूल सहायक मधू दोनोडे, तलाठी श्रीमती ठाकरेले, तलाठी अमित बडोले, नायब तहसीलदार आर. एन. पालांदूरकर व कोतवाल कपिल हारोडे हे कर्मचारी कोलते कुटुंबाच्या मदतीसाठी धावून आले.

..........

प्रशासनात माणुसकी जिवंत

प्रशासनामध्ये काम करताना संवेदनशीलता जोपासणे, आपले हृदय कोमल असणे, इतरांचे दुःख पाहून डोळ्यात पाणी येणे या बाबी अतिशय महत्त्वाच्या म्हटल्या पाहिजेत ! गोंदिया जिल्हा प्रशासनामध्ये या बाबींची कुठेही उणीव नाही. गोंदिया जिल्हा प्रशासनामध्ये व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये माणुसकी अजूनही जिवंत आहे हे या प्रसंगातून ठळकपणे दिसून येत आहे.