शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी तिसऱ्यांदा निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 22:06 IST

शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात यावे यासाठी नगर परिषदेने विशेष सर्वसाधारण सभेत ठराव पारीत केला. शहरवासीयांसाठी हा आनंदाचा विषय असला तरिही खेदाची बाब अशी की, कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम करण्यास कुणीही इच्छूक नसल्याचे ......

ठळक मुद्देप्रकरण चालले रेंगाळत : काम करण्यास कुणीही इच्छूक नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात यावे यासाठी नगर परिषदेने विशेष सर्वसाधारण सभेत ठराव पारीत केला. शहरवासीयांसाठी हा आनंदाचा विषय असला तरिही खेदाची बाब अशी की, कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम करण्यास कुणीही इच्छूक नसल्याचे काढण्यात आलेल्या निविदेतून दिसून येत आहे. परिणामी यापुर्वी दोन वेळा काढण्यात आलेल्या निविदांत कुणीही भाग घेतला नाही. त्यामुळे नगर परिषदेला आता नवीन आर्थिक वर्षात पहिल्यांदा, मात्र वास्तवीक तिसऱ्यांदा निविदा काढावी लागली आहे.शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे रात्रीला घरातून निघणे धोकादायक झाले आहे. हे बेवारस कुत्रे कधी कुणाचा चावा घेतील याचा काही नेम नसून अशा घटना शहरात घडल्या आहेत. त्यामुळे बेवारस कुत्र्यांना बघूनच शहरवासी घाबरत आहेत. शहरवासियांची ही समस्या लक्षात घेत नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी २७ आॅक्टोबर २०१७ रोजी घेतलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शहरातील बेवारस कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा प्रस्ताव मांडला होता.शहरातील वातारवरणाच्या दृष्टीने हा प्रस्ताव योग्य असल्याने सर्वानुमते या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान कुत्र्यांच्या निर्बिजकरणाच्या या कामासाठी नगर परिषद स्वच्छता विभागाने जानेवारी महिन्यात निविदा काढली होती. फेब्रुवारी महिन्यात निविदा उघडण्यात आली असता आश्चर्याची व तेवढीच खेदाची बाब अशी की, या निविदेत कुणीही अर्ज टाकला नाही. यामुळे कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम होऊ शकले नाही.नगर परिषदेने या विषयावर ठराव घेतला असल्याने तसेच शहरवासीयांच्या हिताचा हा विषय असल्यामुळे स्वच्छता विभागाला हे काम करणे गरजेचे झाले आहे. परिणामी, स्वच्छता विभागाने मार्च महिन्यात दुसरी निविदा काढली. मात्र त्याचाही काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे आता नगर परिषदेने नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल महिन्यात शनिवारी (दि.६) पहिली, मात्र वास्तवीक तिसऱ्यांदा निविदा काढली आहे.तोडगा काढणे गरजेचेबेवारस कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढणे अत्यंत गरजेचे झाले असल्याचे दिसत आहे. मध्यंतरी सिव्हील लाईन्स परिसरात एका चवताळलेल्या कुत्र्याने कित्येकांना चावा घेतला होता. या प्रकारामुळे सिव्हील लाईन्सवासी दहशतीत वावरत होते. असे प्रकार अन्यत्र कोठे ही घडू नये यासाठी कुत्र्यांच्या या समस्येवर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी शहरवासी करीत आहेत.

टॅग्स :dogकुत्रा