शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

त्यांनी नाही केले, तुम्ही करून दाखवा

By admin | Updated: August 9, 2014 23:47 IST

या आठवड्यात गोंदिया नगर पालिकेच्या राजकारणात एक तपानंतर मोठा बदल झाला आणि भाजप-सेना युतीचे पदाधिकारी पूर्ण बहुमताने प्रथमच सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाले. १२ वर्षापूर्वी अवघ्या

मनोज ताजने - गोंदियाया आठवड्यात गोंदिया नगर पालिकेच्या राजकारणात एक तपानंतर मोठा बदल झाला आणि भाजप-सेना युतीचे पदाधिकारी पूर्ण बहुमताने प्रथमच सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाले. १२ वर्षापूर्वी अवघ्या ५ महिन्याचा अल्प काळ सोडला तर भाजपला कधीही नगर पालिकेत सत्तेची फळं चाखायला मिळाली नाहीत. कायम विरोधकांच्या भूमिकेत वावरताना सत्ताधारी काँग्रेस-राकाँ पदाधिकाऱ्यांच्या चुका उघडकीस आणण्याचे काम त्यांनी अनेक वेळा केले. पण आता बाजी पलटली आहे. विरोधी बाकावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे तेच नगरसेवक आता सत्तेच्या बाकावर दिसणार आहेत. त्यामुळे आपल्या कामाची चुणूक दाखवून आम्ही काहीतरी वेगळे करू शकतो, असे दाखविण्याचे आव्हान आता नवीन सत्ताधाऱ्यांसमोर राहणार आहे.शहराचे रंगरूप बदलविण्यासाठी गेल्या काही वर्षात चांगल्या योजना राबविण्यात ना कधी सत्ताधाऱ्यांनी ‘इंटरेस्ट’ दाखविला, ना विरोधकांनी कोणत्या योजनेचा आग्रह धरला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात गोंदिया शहराचे बकाल रूप कायम अजूनही कायम आहे. शहरातील एखाद्या चौकाचे सौंदर्यीकरण तर दूर, साधा स्वच्छ-सुंदर रस्ताही इथे पहायला मिळणे दुरापास्त आहे. योजना येतात आणि कागदावरच जिरतात, पण शहराचे चित्र मात्र बदलताना दिसतच नाही. कदाचित त्यामुळेच की काय अडीच वर्षापूर्वी शहरवासीयांनी न.प.मधील सत्ताधाऱ्यांच्या बाजुने कौल दिला नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेत दोन अपक्षांना आपल्या बाजुने वळवून सत्ता काबीज केली आणि दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अडीच वर्षे राज केले. पण अडीच वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला जे जमले ते यावेळी काँग्रेसला आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी करणे जमले नाही आणि सत्तेची सूत्रे अखेर भाजप-सेनेच्या ताब्यात गेली.विरोधी बाकावर बसण्याची सवय नसलेल्या काँग्रेस-राकाँच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी पहिल्यांदाच हे सर्व जड अंत:करणाने सहन करावे लागत आहे. पण आता हाती असलेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत भाजप-सेना युतीच्या पदाधिकाऱ्यांना बऱ्याच गोष्टी करून दाखवाव्या लागणार आहेत. शहरवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करताना त्यांना जुन्या पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या चुका दुरूस्त करून स्वच्छ प्रशासन देऊन खऱ्या अर्थाने विकासकामांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या चुकांवर बोट ठेवताना जी भूमिका राहात राहात होती तीच भूमिका आताही कायम ठेवून आपल्या चुका काढण्याची संधी विरोधात बसलेल्या काँग्रेस-राकाँच्या पदाधिकाऱ्यांना देऊ नये. शहराच्या विकासाचा बॅकलॉग भरपूर आहे. तो एका झटक्यात भरून निघण्याची अपेक्षा नसली तरी त्या दृष्टीने वाटचाल सुरू करणे एवढी अपेक्षा तर रास्त आहे.