शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

योजनांच्या लाभासाठी हे अभियान

By admin | Updated: November 7, 2015 01:49 IST

महसूल प्रशासन लोकाभिमुख गतिमान व सुलभ होण्याबरोबर नागरिकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न समस्या व अडचणी थेट समजून गावातच सोडविणे महत्वाचे आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : कोका येथे महाराजस्व अभियानकरडी (पालोरा) : महसूल प्रशासन लोकाभिमुख गतिमान व सुलभ होण्याबरोबर नागरिकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न समस्या व अडचणी थेट समजून गावातच सोडविणे महत्वाचे आहे. नागरिकांचे प्रश्न त्वरित निकाली निघण्याच्या दृष्टीने आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मध्यस्थाशिवाय देण्याच्या दृष्टीने महाराजस्व अभियान सन २०१५-१६ अंतर्गत विस्तारित स्वरूपातील समाधान शिबिर असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.कोका येथील महाराजस्व अभियानाचे शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. समाधान शिबिर यशस्वी होवून थेट लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने कोका येथे जय्यत तयारी केली.ग्रामपंचायत व स्टेट बँक कार्यालयाचे परिसरात आयोजित शिबिरात विविध विभागांनी सहभाग नोंदविली. जिल्हाधिकाऱ्यांनी शिबिरानंतर थेट नागरिकांशी कोणत्याही अडथळ्याविना संवाद साधला. कोका येथील वनविभागाच्या विश्रामगृहातही सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत नागरिकांचे प्रश्न, समस्या अडचणी व मागण्या समजून घेतल्या. त्वरित कार्यवाहीचे आश्वासनही देण्यात आले. अधिकाऱ्यांना समस्या, प्रश्न सोडवणुकीचे निर्देशही दिले.नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यां समोर मांडलेल्या समस्यांमध्ये सुरेवाडा उपसा सिंचन योजनेचे काम धीम्या गतीने आहे. विभाग मात्र कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगत आहे. मात्र कामे प्रलंबित आहेत. करचखेडा उपसा सिंचन योजना अजुनही रखडलेली आहे. गोंदिया जिल्ह्यातील रेतीची ओव्हरलोड वाहतुक करडी, खडकी, ढिवरवाडामार्गे भंडारा, नागपूरला होत आहे. ती बंद करून खापा, मोहाडी मार्गे करण्यात यावी.आदी मागण्यांचा समावेश आहे.यावेळी उपवनसंरक्षक प्रविणकुमार, उपविभागीय अधिकारी संपत खिल्लारी, तहसीलदार सुशांत बंन्सोडे, खंडविकास अधिकारी मंजुषा ठवकर, अभयारण्याचे वनक्षेत्राधिकारी देवेंद्र कुंभारे, जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपते, सरपंच नरवीर टेकाम, उपसरपंच शिवशंकर शहारे, पंचायत समिती सदस्य नीतू सेलोकर, रवीन्द्र तिडके, रवीन्द्र रामटेके, कुंडलीक हातझाडे, सहायक वनक्षेत्राधिकारी खान, मारबते, सुधाकर तिडके, ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील सरपंच, उपसरपंच व सदस्य, आरोग्य, कृषी, पशु संवर्धन, राजस्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी हजर होते. अभियानादरम्यान महसूल विभागाशी संबंधित समस्यांचा निपटारा करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.(वार्ताहर)