शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बिरसी विमानतळावरून नियमित उडणार विमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:19 IST

विजेंद्र मेश्राम खातिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील विमानतळावर पायलट प्रशिक्षण केंद्र असून या विमानतळावर केवळ हिवाळ्याच्या चार महिनेच ...

विजेंद्र मेश्राम

खातिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील विमानतळावर पायलट प्रशिक्षण केंद्र असून या विमानतळावर केवळ हिवाळ्याच्या चार महिनेच पायलट प्रशिक्षण दिले जात होते. मात्र आता या विमानतळावरून वर्षभर पायलटला प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे आता नियमित छोटी विमाने उडत असल्याचे दृश्य जिल्हावासीयांना पाहायला मिळणार आहे.

बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून लवकरच या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या विमानतळाचे महत्त्व अधिक वाढणार असून या परिसरात रोजगाराच्या नवीन संधी सुध्दा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधायुक्त विमानतळ असल्याने या ठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामुळे २००७ पासून या विमानतळावर उत्तर प्रदेशातील इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डान अकॅडमी रायबरेलीचे प्रशिक्षक पायलट प्रशिक्षण केंद्र आहे. मात्र पूर्वी बिरसी विमानतळावरून केवळ हिवाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीतच प्रशिक्षण केंद्र सुरू राहत होते. हिवाळ्यात रायबरेली येथे धुक्याची समस्या राहत असल्याने पायलटला प्रशिक्षण घेण्यास अडचण निर्माण होत होती. त्यामुळेच या कालावधीत बिरसी येथील विमानतळावर प्रशिक्षण दिले जात होते. मात्र या वर्षीपासून आता बिरसी विमानतळावरूनच वर्षभर पायलटला प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डान अकॅडमी रायबरेलीचे प्रशिक्षक पायलट प्रशिक्षण केंद्राचे संचालक कृष्णेंदु गुप्ता यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

....................

२०० पेक्षा अधिक पायलटने घेतले प्रशिक्षण

बिरसी येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डान अकॅडमी रायबरेलीचे पायलट प्रशिक्षण केंद्र असून आतापर्यंत या पायलट प्रशिक्षण केंद्रातून आतापर्यंत २०० हून अधिक पायलट झाले आहे. पायलटला प्रशिक्षण देण्यासाठी येथे सहा लहान प्रशिक्षक विमान उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे अल्पावधीत हे पायलट प्रशिक्षण केंद्र देशात सर्वत्र नावारुपास आले आले आहे. यासाठी बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक विनय ताम्रकार व अधिकारी सुध्दा सहकार्य करीत आहे.

...............