शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

स्पर्धेतूनच राष्ट्रीय खेळाडू घडतील

By admin | Updated: February 13, 2016 01:15 IST

जीवनातील प्रत्त्येक टप्प्यात मानसाला स्पर्धेला सामोरे जावे लागते. या स्पर्धेत कधी विजय होतो, तर कधी पराजय. या दोन्ही परिस्थितीतून माणूस हा घडत जातो.

राजकुमार बडोले : खुल्या कबड्डी स्पर्धेत संत गाडगेबाबा मंडळ विजेता गोंदिया: जीवनातील प्रत्त्येक टप्प्यात मानसाला स्पर्धेला सामोरे जावे लागते. या स्पर्धेत कधी विजय होतो, तर कधी पराजय. या दोन्ही परिस्थितीतून माणूस हा घडत जातो. क्रीडा स्पर्धेला ही बाब लागू आहे. अशा स्पर्धेतूनच ग्रामीण भागातील खेळाडूंना नैपुण्य दाखविण्याची संधी मिळते व ते पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यापर्यंत मजल मारतात. जिल्ह्यात खेळाडूंसाठी सोयीसुविधा व निधी उपलब्ध करण्यात येत असून यापासून भरीव कार्य होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.ते येथील यंग मल्टीपरपज सेंटरच्यावतीने रामनगर मनोहर म्युनिसीपल शाळेच्या पटांगणावर आयोजित ओपन कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, भाजपचे माजी शहर अध्यक्ष भरत क्षत्रीय, विजयकुमार जायस्वाल, दीपक नशिने, नरेंद्र हालानी, विश्वनाथ सुखदेवे, गजानन नागदवने, भाऊराव उके, प्रदीप ठाकुर, जयंत शुक्ला, शरद क्षत्रीय, केवलराम बादलवार, किरण नखाते, हाजी नईम सुफो, ताराचंद लांजेवार, एन.डी. डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलतांना ना. बडोले यांनी संस्थेचे कौतूक करुन कबड्डी व व्हॉलीबॉल सारख्या खेळांचे आयोजन करुन अनेक खेळाडू घडविले असल्याचे सांगून त्यांचे अभिनंदन केले. तसेच मे महिन्यात आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान या स्पर्धेला उपस्थित जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू नितीन देशमुख, सचिन कटरे, उमेश कनोजे, अविनाश कटरे, राकेश यादव, योगेश बोरकर, संतोष समरीत, सुनील नेवारे, शुभम गाते, ज्ञानेश्वर राऊत, सुनील नेवारे, सोफिया मेश्राम, सीमा दिघोरे, शीतल अंबादे यांचा ना. बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.स्पर्धेचा विजेता संघ गोंदियाचा संत गाडगेबाबा मंडळ ठरला. तर मॉ आदिशक्ती मंडळ खर्रा, वीर बजरंग क्रीडा मंडळ डोंगरगाव व वायएमसी गोंदिया हे अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चतुर्थ बक्षिसाचे मानकरी ठरले. तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून राकेश यादव, जितेंद्र पालांदूरकर, राजकुमार लामकासे, सौम्य चाचेरे, योगेश बोरकर यांची निवड करण्यात आली. तत्पुर्वी स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविकेतून सचिव सय्यद वहाब यांनी येत्या आॅक्टोबर महिन्यात राज्यस्तरीय ज्युनिअर कबड्डी स्पर्धेचे आयोजन यंग मल्टीपरपज सेंटरच्यावतीने करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. आयोजनासाठी पंकज बोरकर, दामोदर शेंडे, नितीन पटले, दिनेश मस्करे, जितेंद्र धोटे, उमेश बैस, योगेश बोरकर आदिंनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)