शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जनतेतील दुरावा कमी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 01:53 IST

विविध योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्याला मिळाला तर त्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होते.

विजय सूर्यवंशी : अर्जुनी-मोरगाव येथे महासमाधान शिबिराची पूर्वतयारी गोंदिया : विविध योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्याला मिळाला तर त्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होते. समाधान शिबिरातून लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळाल्यास त्यांना योजनांचा लाभ घेणे सोयीचे होते. अशा प्रकारच्या समाधान शिबिरामुळे शासन, विविध यंत्रणा व जनतेतील दुरावा कमी होण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. अर्जुनी-मोरगाव येथील प्रसन्न सभागृहात गुरुवारी (दि.२७) महाराजस्व अभियानांतर्गत महासमाधान शिबिराच्या पूर्व तयारी निमित्ताने आयोजित दिव्यांग स्वावलंबन अभियान समाधान शिबिराचे उदघाटक म्हणून डॉ. सूर्यवंशी बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने माजी आमदार दयाराम कापगते, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कासीम जामा कुरेशी, माजी जि.प. सभापती उमाकांत ढेंगे, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नामदेवराव डोंगरवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, जि.प. सदस्य मंदा कुमरे, तेजुकला गहाणे, पं.स. सदस्य रामलाल मुंगनकर, तहसीलदार सिध्दार्थ भंडारे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांची उपस्थिती होती. डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी समाधान शिबिरात नागरिकांचे समाधान ज्याप्रमाणे करीत आहेत, त्याप्रमाणे कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचे समाधान करावे. समाधान शिबिराला लोकचळवळीचे स्वरु प आले आहे. अनेक नागरिक विविध योजनांची माहिती जाणून घेताना व लाभ मिळण्यासाठी अर्ज भरताना दिसत आहेत. पालकमंत्री बडोले यांच्या प्रयत्नांमुळे हे शिबिर होत आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. माजी आमदार कापगते म्हणाले, शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. परंतु समाधान शिबिराच्या आयोजनामुळे लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळत आहे व लाभ घेणे सोयीचे होत आहे, असे त्यांनी सांगितले. गहाणे म्हणाल्या, समाधान शिबिर हे लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळण्यास व लाभ घेण्यास उपयुक्त ठरत आहे. समाधान शिबिरामुळे कमी कालावधीत योजनांचा लाभ घेणे शक्य झाले आहे. शिबिरामुळे लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी वारंवार संबंधित कार्यालयात जाण्याची आवश्यकता पडणार नाही, असे सांगितले. शिबिराला अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावपातळीवरील विविध यंत्रणांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध यंत्रणांच्या स्टॉल्समधून लाभार्थ्यांना व नागरिकांना योजनांची माहिती व लाभ घेण्यासाठी अर्जाचे वाटप करण्यात आले. या वेळी लाभार्थ्यांना व मृतकांच्या वारसांना योजनेचे धनादेश वाटप केले. जवळपास १७ हजार नागरिक व लाभार्थ्यांनी या शिबिरात आपली नोंदणी केली. दिव्यांग स्वावलंबन अभियानाची तसेच समाधान शिबिराविषयीची माहिती गजानन वाघ यांनी दिली. प्रास्ताविक तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी मांडले. संचालन डॉ. दिलीप नाकाडे यांनी केले. आभार गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)