शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महिला सरपंचावरील अविश्वास बारगळला

By admin | Updated: September 23, 2016 02:06 IST

देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चिल्हाटी ग्रामपंचायतमधील महिला सरपंच ईमलाबाई बडाबाग यांच्यावर पाच सदस्यांनी आणलेला

गोंदिया : देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चिल्हाटी ग्रामपंचायतमधील महिला सरपंच ईमलाबाई बडाबाग यांच्यावर पाच सदस्यांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव तहसीलदार संजय नागतिलक यांनी निरस्त केला.विशेष म्हणजे नऊ सदस्यसंख्या असलेल्या चिल्हाटी ग्रामपंचायतमध्ये दोन सदस्यांची पदे रिक्त आहेत. ग्रामपंचायत अधिनियमानुसार, महिला सरपंचावर अविश्वास आणण्याकरिता तीन चतुर्थांश सदस्यसंख्या असणे अनिवार्य आहे. परंतु अविश्वास आणणारे केवळ पाचच सदस्य असल्याने व नियमानुसार आवश्यक सहा सदस्यांची गरज असल्याने अविश्वास बारगळला. तहसीलदार संजय नागतिलक यांनी ग्रा.पं.च्या पाच सदस्यांच्या अविश्वास अर्जावर २० सप्टेंबर मंगळवारला सभा बोलविली. या सभेत केवळ पाच सदस्यांनी मतदान केल्याने अविश्वास पारित होऊ शकला नाही. त्यामुळे सरपंच ईमला बडाबाग यथावत आपल्या पदावर राहणार आहेत. ग्रामसेवक एम.एम. कोवे यांनी सरपंच ईमबलाबाई यांची खोटी स्वाक्षरी करुन तीन लाख रुपयांची उचल १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून केल्याचे बोलले जाते. मात्र हा ठपका ठेवून पाच सदस्यांनी सरपंचावर खोटे आरोप लावून अविश्वास आणण्याचे ठरविले होते. परंतु अविश्वास बारगळला. या ग्रामपंचायतमध्ये तीन लाख रुपये गहाळ करणाऱ्या ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई केव्हा होणार? असा सवाल केला जात आहे . (तालुका प्रतिनिधी)