शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जाळण्यासाठी लाकडं नाहीत म्हणून मृतदेहच वन कार्यालयात आणला; गोंदिया जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:40 IST

विद्युत शवदाहिनी नाही. प्रेताचे करावे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी चक्क प्रेतच वन विभागाच्या कार्यालयात आणले. हा प्रकार मंगळवारी दुपारी अर्जुनी मोरगाव येथे घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मृतदेह जाळण्यासाठी वन विभागाच्या आगारात लाकूड उपलब्ध नाही.शहरात पर्यायी सुविधा नाही.विद्युत शवदाहिनी नाही. प्रेताचे करावे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी चक्क प्रेतच वन विभागाच्या कार्यालयात आणले. हा प्रकार मंगळवारी दुपारी अर्जुनी मोरगाव येथे घडला.अर्जुनी मोरगाव येथील नरेश तरजुले या युवकाचे निधन झाले. त्याचेवर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार होते. स्थानिक स्मशानभूमीत विद्युत शव दाहिनीची सुविधा नाही. वन आगारातून लाकडे विकत घेऊनच प्रेत जाळली जातात. आप्तेष्टांनी वन कार्यालय गाठले. मात्र तिथे कित्येक महिन्यांपासून लाकडेच नाहीत. गावात लाकूड मिळण्याची दुसरी व्यवस्था नाही. आता प्रेताचे करायचे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी चार चाकी वाहनांतून चक्क प्रेतच वन विभागाच्या कार्यालयात आणले. वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्गे यांचेशी चर्चा केली. त्यांनी आपल्या आगारात साठा नसल्याचे सांगितले.नवेगावबांधच्या आगारातून आणण्याचा सल्ला दिला. १५ कि.मी.अंतरावर एखादे वाहन घेऊन जाणे सामान्यांना आर्थिकदृष्टया परवडण्यासारखे नाही. मृतक हा अगदी सामान्य कुटुंबातला होता. दबाव वाढतच होता. ही बाब आ.मनोहर चंद्रिकापुरे यांचे निदर्शनास आणून दिली. त्यांनी सुद्धा उपवनसंरक्षक युवराज यांना भ्रमणध्वनीवर कळविली. अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्गे, क्षेत्र सहाय्यक गोटेफोडे यांनी मृतकाच्या नातेवाईकांना वन आगारात येण्यास सांगितले. इकडून-तिकडून प्रेत जाळण्यापूरते लाकूड उपलब्ध करून देण्यात आले. मृतकाच्या कुटुंबियांना लाकूड उपलब्ध करून देण्यासाठी आर.के.जांभुळकर, त्रिशरण शहारे यांनी प्रयत्न केले. या वेळी मृतकाचे वडील पुरुषोत्तम तरजुले, विनोद शहारे, विक्की लांडे, अजय बडोले, रुपलाल बनकर, खुमदेव शहारे उपस्थित होते. अर्जुनी मोरगावच्या वन आगारात प्रेत जाळण्यासाठी लाकूड नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.मागणी नोंदविली आहेप्रेताच्या अंत्यविधीसाठी लाकूड ठेवले जाते. हा साठा संपलेला आहे. वन आगारात अजिबात लाकूड नाही. आगामी काळात ही समस्या उग्र रूप धारण करू नये यासाठी आपल्या विभागाकडे मागणी नोंदविली आहे. मात्र अजूनही लाकडे उपलब्ध झाली नाहीत अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्गे यांनी दिली.

महामारीत लाकडांचा दुष्काळदेशात सर्वत्र कोरोना विषाणूंचा संसर्ग सुरू आहे. महामारी घोषित करण्यात आली. महाराष्ट्रात प्रादुर्भाव वाढतच आहे. तालुक्यात ३२ जण बाधित आढळून आले. या पार्श्वभूमीवर प्रेत जाळण्यासाठी वन आगारात लाकूड उपलब्ध नसणे ही चिंतेची बाब आहे. वन विभागाचे वरीष्ठ अधिकारी हे गांभीर्याने घेत नाही. नवेगावबांधच्या आगारातून लाकूड आणणे सर्वसामान्यांना शक्य होत नाही.तातडीने वन विभागाने उपाययोजना करावी अन्यथा यासाठी जनआंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आर.के.जांभुळकर यांनी दिला आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग