शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांच्या बढतीवर लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 05:00 IST

आता जिल्ह्यात ४ ॲक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. यामध्ये २ रुग्ण गोंदिया तालुक्यातील असून प्रत्येकी एक रुग्ण आमगाव व देवरी तालुक्यातील आहे. आता रुग्णवाढीला खंड पडला असला तरीही नागरिकांनी आतापासूनच खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, कोरोनाची तिसरी लाट आता कुणालाही परवडणारी ठरणार नाही. याकरिता तोंडावर मास्क व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  मागील ३-४ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढली नसून, पडलेला हा खंड जिल्हावासीयांसाठी दिलासादायक ठरत आहे. असे असतानाच मंगळवारीही (दि. १२) जिल्ह्यात एकही नव्या बाधितांची नोंद नाही. यामुळे जिल्ह्यात आता ४ ॲक्टिव्ह रुग्ण उरले आहे. ही बाब नक्कीच दिलासादायक असली तरीही घराबाहेर बाहेर पडताना तोंडावर मास्क व शारीरिक अंतराचे पालन करणे गरजेचे आहे.जेवढी जास्त गर्दी तेवढा जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव हे आतापर्यंतच्या अभ्यासातील निष्कर्ष आहे. त्यात सध्या नवरात्र सुरू असल्याने दिवसेंदिवस नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सर्वांचीच चिंता वाढली होती. मात्र, मागील ३-४ दिवसांपासून याला खंड पडला असून आता नवीन बाधितांची नोंद आलेली नाही. रविवारी व सोमवारी नवीन बाधितांची नोंद नसतानाच मंगळवारीही (दि. १२) सातत्याने वाढत असलेल्या रुग्णवाढीला खंड पडल्याचे दिसले. एकंदर कोरोनाबाधितांच्या बढतीवर ब्रेक लागल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे. यानंतर आता जिल्ह्यात ४ ॲक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. यामध्ये २ रुग्ण गोंदिया तालुक्यातील असून प्रत्येकी एक रुग्ण आमगाव व देवरी तालुक्यातील आहे. आता रुग्णवाढीला खंड पडला असला तरीही नागरिकांनी आतापासूनच खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, कोरोनाची तिसरी लाट आता कुणालाही परवडणारी ठरणार नाही. याकरिता तोंडावर मास्क व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

११. ८९ लाख डोस लावले- कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने कहर केला असून, कित्येकांना त्यांच्या आप्तांपासून हिसकावून नेले आहे. यामुळे कोरोनाची भीती ज्यांच्या घरातील व्यक्ती गेली त्यांनाच जास्त चांगली समजून आली आहे. मात्र, त्यानंतरही कित्येक लोक निष्काळजीपणे वागताना दिसत असून लस घेणे टाळत आहेत. मात्र, कोरोनापासून तुमचा व कुटुंबीयांचा बचाव करण्यासाठी फक्त लस हाच एकमेव रामबाण उपाय असून, लवकरात लवकर लस घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११८८९०८९ डोसेस लावण्यात आले आहेत.लसीकरणानेच धोका टळला -दुसऱ्या लाटेने कहर केल्यानंतर लगेच ऑगस्ट महिन्यापासून तिसऱ्या लाटेबाबत तर्कवितर्क लावले जात होते. त्यानुसार ही लाट पुढे-पुढे सरकत चालली आहे. मात्र, जोमात सुरू असलेल्या लसीकरणामुळेच तिसऱ्या लाटेचा धोका आतापर्यंत निर्माण झालेला नाही. एकंदर लसीकरणच कोरोनाला हद्दपार करणार असल्याचे स्पष्ट दिसून येते. अशात कोरोनामुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी आतापासून नियमांचे पालन करूनच कोरोनाला हद्दपार करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या