शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात जाणवते डॉक्टरांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:31 IST

सडक अर्जुनी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात पाय रोवले आहे. परंतु डॉक्टरांची कमतरता जाणवत असल्याने रुग्णांवर वेळेत उपचार ...

सडक अर्जुनी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात पाय रोवले आहे. परंतु डॉक्टरांची कमतरता जाणवत असल्याने रुग्णांवर वेळेत उपचार मिळणे कठीण झाले आहे. काहीजण भीतीपोटी रुग्णालयात जात नसल्याची देखील माहिती आहे.

ग्रामीण भागातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून असतात. सर्दी, खोकला, ताप आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार घेतात. परंतु पॉझिटिव्ह रिपोर्ट येईल. या भीतीने नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यास कुचराई करतात. प्राथमिक आरोग्य केंद्रातून सरळ जिल्ह्याच्या ठिकाणी पाठविले जाते. शिवाय मृत्यू ओढवल्यास नातेवाईकांना मृतदेह मिळत नसल्यामुळे घरी उपचार करण्यावर प्राधान्य देतात. सध्या ग्रामीण भागात ‘व्हायरल फ्ल्यू’ ने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, टायफाॅइडचे रुग्णाचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांची संख्या अल्प प्रमाणात असल्यामुळे रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळत नाही. शिवाय दवाखान्यात गर्दी वाढलेली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे डॉक्टर खबरदारी बाळगत आहेत. कोरोनाच्या टेस्ट शिवाय उपचार करण्यास तयार होत नाहीत. ग्रामीण भागात उच्च शिक्षित डॉक्टर वैद्यकीय सेवा देण्यास कुचराई करतात. शिवाय ग्रामीण भागात उच्च शिक्षित डॉक्टर दवाखाने उघडत नाही. शहरी भागात वैद्यकीय सेवा देण्यास प्राथमिकता देतात. ग्रामीण भागात बीएएसमएस, बीएचएमएस आदी अर्हता धारक डॉक्टर दवाखाने उघडून वैद्यकीय सेवा पुरवितात. तालुक्याच्या ठिकाणी चार-पाच एमबीबीएस डॉक्टर वैद्यकीय सेवा पुरवतात. हजारो लोकसंख्येच्या मागे डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे वेळेवर योग्य उपचार मिळत नाही. अशावेळी रुग्ण बोगस डॉक्टरांकडून उपचार करुन घेत असल्याचेही दिसत आहे.