या ठिकाणी मंडल अधिकारी नसल्यामुळे ज्या कृषी सहायकांना परिसरातील जे गाव दिले आले त्या ठिकाणी मुख्यालयी ते हजर राहत नाही. दूरवरून अप-डाऊन करतात. ११ वाजता कार्यालयाची वेळ असून या कार्यालयात कोणीच कर्मचारी वेळेवर येत नाही. आम्ही मुख्यालयात राहतो यांची माहिती शासनाकडे पुरवून शासनाकडून घरभाड्याची नियमित उचल करतात. या कार्यालयात बऱ्याच दिवसांपासून चपराशी नाहीत. त्यामुळे याच गावातील एक युवक रोजंदारीवर या कार्यालयात काम करीत आहे. कार्यालयात एखादा शेतकरी शेतीच्या सल्ला घेण्याकरिता आला असता कृषी सहायक दौऱ्यावर गेले सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असतात. त्यामुळे त्यांना आल्या पावलीच मागे फिरावे लागते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी होत आहे.
कार्यालय आहे; मात्र कृषी मंडल अधिकारी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:25 IST