शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

गावात चुली पेटल्याच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 05:00 IST

तालुक्यातील कालीमाटी  गावातील चार मुलांचा  मंगळवारी (दि. ८) पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने ३००० लोकसंख्येच्या गावात फक्त रडण्याचा आवाज ऐकू येत होता. कुणाचा मित्र, कुणाचा मुलगा, कुणाचा जवळचा नातेवाईक या घटनेत गमावला गेल्याने मंगळवारी सकाळपासून तर बुधवारी सायंकाळपर्यंत गावात स्मशानशांतता पसरली होती. दु:खाच्या आवेगात गावात चुली पेटल्याच नाही. चौघांवरही बुधवारी (दि.८) रात्री सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावकऱ्यांच्या अश्रूंचा बांध कोणीच थांबवू शकला नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव :  काळ कधी कसा येईल, याचा नेम नाही. अगदी आनंदात असलेल्या वातावरणावर विरजण घालत काळाने झडप घालून क्षणात चौघांना हिरावले. अन् या दुःखाच्या क्षणात कालीमाटी गावात चुली पेटल्याच नाही.तालुक्यातील कालीमाटी  गावातील चार मुलांचा  मंगळवारी (दि. ८) पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने ३००० लोकसंख्येच्या गावात फक्त रडण्याचा आवाज ऐकू येत होता. कुणाचा मित्र, कुणाचा मुलगा, कुणाचा जवळचा नातेवाईक या घटनेत गमावला गेल्याने मंगळवारी सकाळपासून तर बुधवारी सायंकाळपर्यंत गावात स्मशानशांतता पसरली होती. दु:खाच्या आवेगात गावात चुली पेटल्याच नाही. चौघांवरही बुधवारी (दि.८) रात्री सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावकऱ्यांच्या अश्रूंचा बांध कोणीच थांबवू शकला नाही. तान्हा पोळ्याच्या दिवशी मंगळवारी सकाळी मारबत विसर्जनासाठी गाव शिवारजवळील वाघ नदीत आंघोळीसाठी उतरले असता संतोष अशोक बहेकार (१९), रोहित नंदकिशोर बहेकार (१८), मयूर अशोक खोब्रागडे (२१), सुमित दिलीप शेंडे (१८) या चौघांचा नदीत वाहून सणाच्या दिवशी जीव गेला.   चारही कुटुंबातील एकुलती एक मुले पाण्यात वाहून गेल्याची माहिती धडकताच गावात स्मशानशांतता पसरली.  जो तो आठवणीत गहिवरताना दिसत होता. संतोष, रोहित, मयूर, सुमित हे आईवडिलांना वारस म्हणून एकुलते होते.  कुटुंबातील बहिणींनी एकुलता भाऊ गमावल्यामुळे त्यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला होता. काही दिवसांपूर्वी साजरा केलेला रक्षाबंधनाचा सण बहिणीसाठी शेवटचा ठरला.  सर्व कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या उपस्थितीत चौघांवरही कालीमाटी येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मृतांच्या नातेवाईकांसोबतच अंत्यसंस्काराला उपस्थित जनसमुदायालाही त्यांचे अश्रू आवरता आले नाही. मन हेलावून सोडणाऱ्या या घटनेने कालीमाटी गावात मात्र चुली पेटल्या नाही.

कानी आला फक्त रडण्याचा आवाज मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच मृत चारही मुलांच्या कुटुंबीयांच्या रडण्याचा आवाज सोडून गावात शांतता पसरली होती. बुधवारी सकाळ चौघांचे मृतदेह हाती येताच गावात अश्रूंचा पूरच आला व फक्त रडण्याच्या आवाजाने कालीमाटी दणाणले होते.

 

टॅग्स :Deathमृत्यू