शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना बाधिताची नोंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 05:00 IST

गर्दी वाढल्यास कोरोनाला फोफावण्यासाठी वातावरण मिळते व तेथूनच घात होतो असे आता सुमारे २ वर्षांतील अभ्यासातून दिसून आले आहे. त्यात आता नवरात्री सुरू असून जिल्हाभरातच गर्दी वाढत चालली आहे. शिवाय दिवाळी तोंडावर असल्याने नागरिक आता बाजाराची धाव घेताना दिसत आहेत. हेच कारण आहे की वाढती गर्दी बघता कोरोनाचा धोकाही वाढत आहे. यातूनच मागील २-३ दिवसांपासून सातत्याने दररोज एका बाधिताची नोंद जिल्ह्यात घेतली जात होती व ही आकडेवारी ४ वर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  २-३ दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधितांची वाढ होत असल्याने ऐन नवरात्रीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, रविवारी (दि.१०) जिल्ह्यात एकाही बाधिताची नोंद नसल्याने तेवढाच दिलासा मिळाला असून सातत्याने होत असलेल्या रुग्णवाढीला खंड पडला. आता जिल्ह्यात ४ ॲक्टिव्ह रुग्ण असून जिल्हावासीयांनी खबरदारी घेतल्यास लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो. गर्दी वाढल्यास कोरोनाला फोफावण्यासाठी वातावरण मिळते व तेथूनच घात होतो असे आता सुमारे २ वर्षांतील अभ्यासातून दिसून आले आहे. त्यात आता नवरात्री सुरू असून जिल्हाभरातच गर्दी वाढत चालली आहे. शिवाय दिवाळी तोंडावर असल्याने नागरिक आता बाजाराची धाव घेताना दिसत आहेत. हेच कारण आहे की वाढती गर्दी बघता कोरोनाचा धोकाही वाढत आहे. यातूनच मागील २-३ दिवसांपासून सातत्याने दररोज एका बाधिताची नोंद जिल्ह्यात घेतली जात होती व ही आकडेवारी ४ वर आली आहे. यामुळे आता कोरोना पुन्हा पाय पसरताना दिसत होता. मात्र, रविवारी (दि.१०) जिल्ह्यात नवीन बाधिताची नोंद नसून सातत्याने वाढत असलेल्या रुग्णवाढीला खंड पडल्याने तेवढाच दिलासा मिळाला आहे. या ४ ॲक्टिव्ह रुग्णांमध्ये २ रूग्ण गोंदिया तालुक्यातील असून प्रत्येकी एक रूग्ण आमगाव व देवरी तालुक्यातील आहे. रविवारी रूग्णवाढीला खंड पडला असला तरीही नागरिकांनी आतापासूनच खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, कोरोनाची तिसरी लाट आता कुणालाही परवडणारी ठरणार नाही. याकरिता तोंडावर मास्क व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. 

जिल्ह्यात ४५७५७४ तपासण्या- जिल्ह्यात आतापर्यंत ४५७५७४ तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये २३६०४० आरटी-पीसीआर तपासण्या असून २२१५३४ रॅपिड अँटिजन आहेत. यानंतर ४१२२५ कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ९.० टक्के आहे. यावरून जिल्ह्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात असून कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी लवकरात लवकर लस घेणे व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.लसीकरण हाच रामबाण उपाय - कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने कहर केला असून कित्येकांना त्यांच्या आप्तांपासून हिसकावून नेले आहे. यामुळे कोरोनाची भीती ज्यांच्या घरातील व्यक्ती गेली त्यांनाच जास्त चांगली समजून आली आहे. मात्र, त्यानंतरही कित्येक लोक निष्काळजीपणे वागताना दिसत असून लस घेणे टाळत आहेत. मात्र, कोरोनापासून तुमचा व कुटुंबीयांचा बचाव करण्यासाठी फक्त लस हाच एकमेव रामबाण उपाय असून लवकरात लवकर लस घेण्याची गरज आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या