शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात प्रमाणित सेंद्रिय शेतीच नाही

By admin | Updated: August 21, 2014 23:57 IST

सेंद्रिय शेती करणे अत्यंत कठिण असते. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात कुठेही प्रमाणित सेंद्रिय शेती नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

गोंदिया : सेंद्रिय शेती करणे अत्यंत कठिण असते. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात कुठेही प्रमाणित सेंद्रिय शेती नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यावर्षी जिल्ह्यात १६ हजार ८६२ हेक्टर क्षेत्रात श्री पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यासाठी एका एकर शेतजमिनीत पाच किलोप्रमाणे बियाणे घालण्यात आले. मागील वर्षीही श्रीपद्धतीने जवळपास १५ ते १५ हेक्टर जमिनीत लागवड करण्यात आली, असे कुरील यांनी सांगितले. सेंद्रिय शेती करणे अत्यंत जिकरीचे काम असते. सतत तीन वर्षांपर्यंत सेंद्रिय शेती करून उत्पादन घेतल्यानंतरच ती शेती सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित केली जाते. सेंद्रिय शेतीसाठी ते क्षेत्र इतर शेतापासून संपूर्णपणे वेगळे करावे लागते. दुसऱ्या रासायनिक शेतातील पाणी त्या शेतात कधीच शिरू नये, याची काळजी घ्यावी लागते. सेंद्रिय शेतीला मिळणारे पाणी रासायनिक खते व पेस्टीसाईड्सपासून मुक्त असणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीसाठी युरोगॅप या विशिष्ट पद्धतीचा वापर करावा लागतो. या पद्धतीसाठी युरोपियन देशांनी काही मानके ठरविली आहेत. यात सर्वात आधी साईल टेस्टींग केली जाते. कीटकनाशकांचे परिणात नष्ट करावे लागतात. सेंद्रिय पदार्थांतूनच जनावरांसाठी चारा तयार करावा लागतो. नंतर त्याच जनावरांच्या शेणाचे खत सेंद्रिय शेतीसाठी उपयोगात आणावे लागते. मजुरांची स्वच्छता यावर मोठा भर असतो. मजूर शौचास जरी गेला तरी विशिष्ट अशा साबणाने त्याला आपले हात स्वच्छ करून घ्यावे लागते. सेंद्रिय शेतात दर दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत त्या एजंसीचे माणसे येवून तपासणी करून जातात. या सर्व प्रकारामुळे सेंद्रिय शेती करणे अत्यंत जटिल असल्यामुळे शेतकरी ही शेती करण्यास सहजासहजी धजावत नाही. सेंद्रिय शेती करण्यासाठी काही प्रमाणात अडचणी आहेत. एमआरएलमुळे (मॅक्सीमम रेसीड्युअल लेवल) सेंद्रिय शेती रासायनिक शेतीला पर्याय ठरू शकते. एमआरएल हे नागपूर येथे असून येथे उत्पादित झालेल्या धान्यातील ३२ प्रकारच्या केमिकल्सची तपासणी केली जाते. धानपीकच नव्हे तर फळभाज्यांसाठी सुद्धा आपण सेंद्रिय शेती करू शकतो. रासायनिक खतांना एका स्तरावर नियंत्रित ठेवून, उत्पादकता कमी न करता सेंद्रिय अन्नाचे उत्पादन घेतले जावू शकते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)