शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

कर्ज घेण्यासाठी काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 21:29 IST

महिला आर्थिक विकास महामंडळ बचत गटाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची उचल करण्यासाठी आता महिलांना काहीही गहाण ठेवण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन आ.विजय रहांगडाले यांनी केले.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : प्रधानमंत्री मुद्रा योजना व महिला मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महिला आर्थिक विकास महामंडळ बचत गटाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची उचल करण्यासाठी आता महिलांना काहीही गहाण ठेवण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन आ.विजय रहांगडाले यांनी केले.महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया,जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवारी (दि.२१) गोरेगाव पंचायत समितीच्या प्रांगणात तेजस्विनी लोकसंचालीत साधन केंद्र गोरेगावमार्फत आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.नगराध्यक्ष आशिष बारेवार, पंचायत समिती सभापती माधुरी टेंभरे, उपसभापती लीना बोपचे, मुद्रा बँक समन्वय समिती सदस्य नंदकिशोर साखरे, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, गटविकास अधिकारी रोहिणी बनकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, आर्थिक साक्षरता गोंदिया केंद्र प्रमुख आर.के.पिहरे, कृषी विज्ञान केंद्र हिवरा कार्यक्रम समन्वयक एन.एस.देशमुख, आय.सी.आय.सी.आय.बँकेचे अमोल राजिगरे, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर उपस्थित होते.रहांगडाले म्हणाले, महिला कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे करतात. जिल्हा नियोजन समितीकडून महिलांचा आर्थिक विकास व्हावा, यासाठी कापडी पिशवी शिलाईचे काम बचतगटाच्या महिलांना मिळेल यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून माविमला निधी प्राप्त करून देण्याची ग्वाही दिली.बारेवार म्हणाले, गोरेगाव शहरी भागाकरिता नवीन भारतीय स्टेट बँकेची शाखा उघडण्याची संपूर्ण प्रक्रि या झाली असून, लवकरच ती आपल्यासाठी सुरु करण्यात येईल. ज्यामुळे कर्ज उपलब्ध होण्यास सोईचे होईल.महिलांना आर्थिक व्यवहार करण्यास मदत होईल असे सांगितले. पिहरे म्हणाले, महिलांच्या विकासात बँकेचे सहकार्य मोठ्या प्रामाणात लाभत सांगितले. जागरे यांनी नाबार्डच्या विविध योजनांची माहिती उपस्थित महिलांना दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश मार्कंड, प्रदिप कुकडकर, योगेश वैरागडे, प्रफुल अवघड, प्रिया बेलोकर, प्रणाली कोटांगले, एकांत वरघने, तेजस्विनी लोक संचालित साधन केंद्राची कार्यकारिणी व सहयोगिनी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी केले तर आभार योगीता राऊत यांनी मानले.महिला बचत गटांना कर्ज व ट्रॅक्टरचे वाटपप्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत विदर्भ कोकण ग्रामीण बँक व बँक आॅफ महाराष्ट्र यांच्यामार्फत बचत गटांच्या १३ माहिलांना ६.५० लाख रुपयांच्या कर्ज प्रकरणाच्या मंजुरीपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आय. सी. आय. सी. आय. बँकेच्या वतीने तीन महिला बचत गटांना कर्ज वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत महिलांना गॅस कनेक्शन वितरण करण्यात आले. स्तुती महिला बचत गटाला समाज कल्याण विभागाच्या वतीने मिनी ट्रॅक्टर वितरीत करण्यात आला.महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरआरोग्य विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलवर असंख्य महिलांनी हिमोग्लोबीनची तपासणी केली व कमी हिमोग्लोबीन असलेल्या महिलांचे या वेळी समुपदेशन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ‘बचतीतून समृद्धीकडे’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी गोरेगाव तालुक्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या विविध बचतगटांचे उत्पादित वस्तू व साहित्य विक्रीच्या स्टॉलला मान्यवरांनी भेट देवून उत्पादित केलेल्या वस्तूंच्या मार्केटिंगबाबत माहिती जाणून घेतली.

टॅग्स :Vijay Rahangdaleविजय रहांगडाले