शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

जगात भूत व भानामती नाहीच- चव्हाण

By admin | Updated: December 16, 2015 02:03 IST

या जगात भूत, भानामती, मंत्र-तंत्र, चेटूक, चमत्कार, देवी अंगात येणे, ज्योतिष बुवाबाजी अजिबात नाही.

नवेगावबांध : या जगात भूत, भानामती, मंत्र-तंत्र, चेटूक, चमत्कार, देवी अंगात येणे, ज्योतिष बुवाबाजी अजिबात नाही. या सर्व अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे जनतेने या बाबींना मुळीच घाबरू नये, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गोंदियाचे जिल्हाध्यक्ष एस.एस. चव्हाण यांनी केले.नत्थुजी पुस्तोडे अनुसूचित आदिवासी आश्रम शाळा देवलगाव येथे विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोना विरोधी कायदा याविषयी ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानगी प्राचार्य एम.पी. कुरसुंगे होते. अतिथी म्हणून मुख्याध्यापक एम.एस. कापगते, प्रा.एच.एस. झाडे, प्रा. बोरकर, प्रा. लंजे, प्रा. पाटणकर, प्रा. खुले, व्ही.एस. लांजेवार उपस्थित होते.शालेय जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोणाचा विकास व्हावा. ढोंगी बुवा-बाबांपासून समाजाला दूर ठेवावे, केवळ अंधश्रद्धांच्याच बाबतीत नव्हे तर जीवनाच्या विविध क्षेत्रांकडे बघण्याचा विज्ञाननिष्ठ दृष्टीकोण प्रत्येकामध्ये रूजला पाहिजे, असेही ते म्हणाले.याप्रसंगी माचिसविना आग लावणे, जिभेत लोखंडी रॉड फसविणे, कानाने चिठ्ठ्यांवरील नाव वाचने, नोटेत रिबिन गायब करणे, अंगातील देवी काढणे, जळता कापूण खाणे इत्यादी प्रयोग एस.एस. चव्हाण यांनी सादर केले. तसेच त्या प्रयोगांची कृतीदेखील सांगितली. संचालन व आभार एस.एम. चाचीरे यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)