शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया व तिरोडा आगारात डिझेलबंदी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:34 IST

कपिल केकत गोंदिया : मागील वर्षापासून कोरोनाने देशात कहर केला आहे. याचे दुष्परिणाम सर्वच क्षेत्रावर दिसून येत आहे. विशेष ...

कपिल केकत

गोंदिया : मागील वर्षापासून कोरोनाने देशात कहर केला आहे. याचे दुष्परिणाम सर्वच क्षेत्रावर दिसून येत आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी पहिल्या लॉकडाऊन काळापासून राज्य रस्ते परिवहन महामंडळाला घरघर लागली असून, त्याचे पडसाद आतापर्यंत दिसत आहेत. मध्यंतरी परिस्थिती सुधारत असतानाच दुसऱ्या लाटेने कहर केला व पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत एसटीला प्रवासी प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी अद्याप आगारांच्या फेऱ्या पूर्णपणे सुरू करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे महामंडळाचा चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. यातूनच आता महामंडळाने आगारांचे डिझेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सुदैवाने अद्यापतरी जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा या दोन्ही आगारांवर अशी पाळी आलेली नाही. दोन्ही आगारांना वर्षभरात कोरोनामुळे कोट्यवधींचा फटका बसला आहे. मात्र उत्पन्नासाठी दोन्ही आगारांकडून प्रयत्नही केले जात आहेत यात शंका नाही.

---------------------------

जिल्ह्यातील आगार आणि कोरोनाकाळात झालेला तोटा

आगार तोटा

गोंदिया १६,४२,५०,०००

तिरोडा १२,७७,५०,०००

-------------------------------------

आगारांच्या डिझेलवर परिणाम नाही

जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा असे दोन आगार आहेत. कोरोनाकाळात म्हणजेच आता सुमारे वर्षभरात या दोन्ही आगारांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. मात्र त्यानंतरही दोन्ही आगारांकडून हा फटका भरून काढण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत. त्यामुळेच आतापर्यंत तरी या आगारांचे डिझेल बंद करण्यात आलेले नाही.

------------------------------

१२ बसेस आगारातच

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची धास्ती आजही कित्येकांच्या मनातून गेलेली नाही. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातही कोरोनाने चांगलाच कहर केल्याने आतापर्यंत ग्रामीण जनतेने बाहेर पडणे टाळले आहे. शिवाय आपल्या खासगी वाहनांनीच प्रवासाला प्राधान्य दिले आहे. परिणामी प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने आगारांनी फेऱ्या कमी केल्या आहेत. यामुळेच गोंदिया आगाराच्या १२ बसेस आगारातच उभ्या आहेत.

------------------------------

बसेस चालविण्यासाठी सर्वात मोठा खर्च म्हणजे डिझेलचा आहे. कोरोनामुळे नक्कीच आगारांचे उत्पन्न घटले असून, त्याचा फटका महामंडळालाही बसला आहे. यातूनच डिझेलबंदी केली जात आहे. मात्र जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारांची डिझेलबंदी झालेली नाही.

- संजना पटले

आगारप्रमुख, गोंदिया

४) नियंत्रकाचा कोट